याप्रसंगी भाजपा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, अटल मंचाचे संस्थापक संदीप बाणखेले, अध्यक्ष नवनाथ थोरात, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, विजय शिंदे, फैज जमादार, स्वप्ना पिंगळे आदी उपस्थित होते.
या वेळी १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी विचार मंच संचलित अटल वैद्यकीय कक्ष माध्यमातून व जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात, डॉ. ताराचंद कराळे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक ठिकाणी शिबिर भरवण्यात येत आहेत, असे आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी सांगितले. शिबिरास देवगंगा हॉस्पिटल व डॉ. नवनाथ लोंढे व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात व माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी भेट दिली. प्रास्ताविक डॉ. रवींद्र कानडे यांनी केले व आभार आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी मानले.