या संमेलनाचे उद्घाटन कवयित्री सुभद्रा वागसकर यांच्या हस्ते झाले. ईशस्तवन सुरभि फडणीस यांनी, तर स्वागतगीत आशा नष्टे यांनी सादर केले. या ऑनलाइन काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मधुसिंधू काव्य प्रकाराच्या निर्मितीकार तथा दौंड येथील कवयित्री माधुरी काकडे होत्या. याप्रसंगी प्रा. पद्मा हुशिंग व प्रा. डॉ. अरुणा मोरे यांनी रसिकांना खिळवून ठेवणारी मनोगते सादर केली. विविध कवी-कवयित्रींचे साहित्यातील योगदान आणि समाजासाठी असलेले बोधप्रद कार्य यावर प्रकाशझोत टाकला.
पर्यावरण, निसर्ग, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आरोग्य, साक्षरता, स्त्रियांचे योगदान अशा विविध सामाजिक विषयांवर कविता सादर झाल्या.
या संमेलनात वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे कवितेच्या माध्यमातून काही कवयित्रींनी बोलून दाखवली.
राजश्री वाणी, प्रा. सुनीता फडणीस यांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
या पहिल्या-वहिल्या काव्यसंमेलनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.