आळेफाटा उपबाजारात चांगल्या प्रतीच्या गाई मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह, तसेच शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरीही येथे खरेदीसाठी येत असतात. यावर्षी पावसाने सर्वत्र सरासरी ओलांडली असल्याने चारा सध्या चांगल्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाचा गाई खरेदीकडे कल वाढला आहे. गेल्या महिन्यापासून येथील गुरुवारच्या आठवडे बाजारात गाईंचे विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी जवळपास ३०० गाई येथे विक्रीस आल्या असल्याचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले, तर प्रतवारीप्रमाणे ३० हजार रुपयांपासून ८० हजार रुपयांपर्यंत येथे गाईंची विक्री झाली असल्याचे कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
दरम्यान, शेतमालाचे बाजारातील चढ उतारपणामुळे दुग्ध व्यवसायाकडे कल वाढला असल्याने गाई खरेदी करण्यासाठी आले असल्याचे बोरी येथील शेतकरी संदेश जाधव यांनी सांगितले.
१६ आळेफाटा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातील संकरित गाईंचा बाजार.