शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवरून जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:31 AM

पुण्यातील पहिलीच घटना; वडिलोपार्जित जमीन हिस्सा प्रकरणातील दिवाणी दावा

पुणे : वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा म्हणून दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात प्रथमच व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून कबुलीजबाब घेत लोकअदालतीमध्ये दावा निकाली काढल्यात आला. व्हिडीओ कॉलद्वारे अर्जदारांना विरोधी पक्षाने ३६ लाख रुपये देण्याचे मान्य करत तडजोडीअंती हा दावा निकाली काढला.वाल्हे गावात असलेल्या सुमारे ६० हेक्टरच्या वडिलोपार्जित जमीनीत पत्नीला हिस्सा मिळावा म्हणून मेव्हणा व त्यांच्या मुलीने व तीन मामा, आज्जी, मावशी आणि ज्यांना जमीन विकण्यात आली त्यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. दोन्ही बाजूंनी तडजोडीची तयारी दर्शविली होती. त्यानुसार विरुद्ध पक्षाने अर्जदारांना ३६ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. तक्रारदारांपैकी एक अर्जदार हजर नसल्याने प्रतिवाद्यांचे वकील अ‍ॅड. सुभाष पवार आणि अ‍ॅड. नितीन झंजाड यांनी अर्जदाराला व्हॉट्सअपवरून व्हिडीओ कॉल केला. न्यायाधीश बधाणे यांच्या पॅनेलने अर्जदाराला तडजोडीला तयार आहे का, अशी विचारणा केली. त्याने संमती दर्शविल्यानंतर हा दावा निकाली काढण्यात आला. तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. अफताब खान यांनी कामकाज पाहिले.लोक अदालतीत प्रथमच अशाप्रकारे विशेष दिवाणी दावा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगचा वापर करून निकाली काढला. संबंधित व्यक्ती दिल्लीत असल्याने उपस्थित राहू शकला नाही. मात्र, या सुविधेमुळे त्यांचा दावा निकाली काढता आला. त्याने दिल्लीला जाण्यापूर्वी तडजोड पत्रावर स्वाक्षरी केली होती, अशी माहिती अ‍ॅड. नितीन झंजाड यांनी दिली.चेक न वटल्याप्रकरणी ८ कोटी ४७ लाखांवर तडजोडव्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेले चेक न वटल्याप्रकरणी दाखल गुन्हा ८ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपयांवर तडजोड करून निकाली काढण्यात आला. चैतन्य सेंटर फॉर सायकॉलोजिक हेल्पने व्यवसायाच्या वाढीसाठी एचडीएफसी बँकेकडून २०१५ मध्ये ७ कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, संबंधित कर्जाची परतफेड करण्याकरिता दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बँकेकडून न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.लोकअदालतमध्ये याबाबत तडजोड होऊन मुद्दल आणि व्याजासह ग्राहकाने आठ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये बँकेला देण्याचे निश्चित करण्यात येऊन दावा निकाली काढण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा दावा प्रथमच लोकअदालतीत निकाली काढण्यात आला. लोकअदालतीत एचडीएफसी बँकेच्या वतीने रोहनएडके हे तर, फर्मच्यावतीने भागीदार रोनी जॉर्ज व सुशपती जॉर्ज उपस्थित राहिले. अ‍ॅड. एम. एस. हरताळकर यांनी बँकेच्या वतीने बाजू मांडली तर बचाव पक्षाच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाचे अनिल तांबे व मिलिंद सोवनी यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयWhatsAppव्हॉटसअ‍ॅप