शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

महायुतीत अस्वस्थता, श्रीरंग बारणेंच्या अडचणीत वाढ? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:20 PM

मावळ मतदारसंघ हा दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. यामध्ये पुण्यासह राजगड जिल्ह्याचा समावेश होतो.....

पिंपरी : पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दोनवेळा खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांच्या चिंतेत वारंवार वाढ होत आहे. महायुतीचे घटकपक्ष बारणे यांचा प्रचार किती सक्रियपणे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. या मतदारसंघातून महायुतीचे इतर अनेक नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण सलग तिसऱ्यांदा बारणे मैदानात उतरले आहेत. मावळ मतदारसंघ हा दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. यामध्ये पुण्यासह राजगड जिल्ह्याचा समावेश होतो.

रायगडमधील उरण, पनवेल आणि कर्जतचा भाग मावळ मतदारसंघात येतो. पिंपरी चिंचवड परिसर त्याचबरोबर रायगडमधील विधानसभा मतदारसंघातील भागात महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते सक्रियपणे काम करत आहेत का नाही हे पाहण्यासाठी दिल्लीवरून सहा जणांचे विषेश पथक आले आहे. हे पथक भाजप पक्षनेतृत्वाला गोपनीय अहवाल सादर करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बारणेंसाठी मनापासून काम करतील की नाही, याची भीती महायुतीला चांगलीच सतावत आहे. 

कमळावर लढणारा उमेदवार देण्याची मागणी-

मावळमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना, तर ठाकरे गटाकडून माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मावळमध्ये मागील १५ वर्षांपासून कमळ चिन्ह नसून या वेळी कमळावर लढणारा उमेदवार देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, बापू भेगडे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु, मावळ मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडेच कायम राहिला. तसेच पुणे आणि राजगडमध्ये विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला होता. 

महायुतीचे काम नाही केल्यास कारवाई-

दिल्लीवरून आलेले हे पथक १० मेपर्यंत मुक्कामी असणार आहे. महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करीत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामगिरीची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. प्रचारापासून अलिप्त, विरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माहिती घेतली जात आहे. त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला महायुतीकडून संधी देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेत्यांची मने जुळणार का?

लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची मने वरकरणी जुळली असली, तरी कार्यकर्त्यांची जुळणार का? शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट एकत्र काम करणार का? असा प्रश्न कार्यकर्तेच विचारत आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. दोन्ही पक्षांतील एकेक गट महायुतीत गेला आहे. मावळमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांच्यात तिकीट जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरू होता. त्यामुळे आता नेत्यांचे जुळले, पण कार्यकर्त्यांचे जुळणार का?, असा प्रश्न आहे.

नेते काय म्हणतात?

शिंदेसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा विकास केला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला उमेदवारी मिळाली आहे. आम्ही महायुतीबरोबर आहोत. मावळातील शिवसैनिक महायुतीत एकजुटीने काम करतील.

टॅग्स :maval-pcमावळshrirang barneश्रीरंग बारणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaigadरायगडbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४sanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटील