पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. परीक्षा दिलेल्या ६९ हजार २७४ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी पुरवणी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी १८.४१ एवढी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ४.७६ टक्क्यांनी घट झाली आहे.
कोरोनामुळे पुरवणी परीक्षा परीक्षा उशीरा घ्याव्या लागल्या. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांमधील ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक २७.६३ टक्के तर कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी १४.४२ टक्के लागला आहे.
चौकट
बारावीचा विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : १४.९४ ,नागपूर : १८.६३ ,औरंगाबाद : २७.६३, मुंबई :१६.४२, कोल्हापूर : १४.८० ,अमरावती : १६.२६ , नाशिक :२३.६३, लातूर :२२.०५, कोकण : १४.४२
-----------------
बारावीच्या विद्यार्थ्यांची विभागीय मंडळनिहाय उत्तीर्णतेचीआकडेवारी
मंडळ परीक्षा देणारे उत्तीर्ण
पुणे १२,८३५ १,९१७
नागपूर ५,७१६ १,०६५
औरंगाबाद ६,९२७ १,९१४
मुंबई २२,७०० ३,७२८
कोल्हापूर ५,३५९ ७९३
अमरावती ३,६७७ ५९८
नाशिक ७,४९२ १,७७०
लातूर ४,०२७ ८८८
कोकण ५४१ ७८
---------------------------------------------------