लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर भारतीय संगीत हा विषय वगळता सर्व विषयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.राज्य मंडळातर्फे विज्ञान, कला व वाणिज्य या तीन शाखेच्या तब्बल १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात पर्यावरण शिक्षण हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होता. या विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच जापनीज, मल्याळम, ड्रॉर्इंग, पिक्टोरिअल कॉम्पोझिशन, स्टेनोग्राफी (मराठी), फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी तसेच मल्टिमीडिया अॅण्ड इंटरनेट टेक्नॉलॉजी १, मल्टिमीडिया अॅण्ड इंटरनेट टेक्नॉलॉजी २ व ३ या तीनही विषयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. या सर्व विषयांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरच्या आत आहे. तर इन्स्ट्रूमेंटल म्युझिक या विषयास १११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.निकाल : (टक्क्यांमध्ये )इंग्रजी - ९०.३३मराठी - ९६.९२हिंदी - ९६.६६संस्कृत - ९८.८७इतिहास - ९४.८७भूगोल - ९४.४०गणित - ९५.८२राज्यशास्त्र - ९५.५७अर्थशास्त्र - ९२.२१भौतिकशास्त्र - ९७.२४रसायनशास्त्र - ९८.००जीवशास्त्र - ९८.०७शिक्षणशास्त्र - ९५.७६बँकिंग - ९८.०८
अकरा विषयांचा निकाल १०० टक्के
By admin | Published: May 31, 2017 3:55 AM