शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्रॉस व्होटिंगचा होणार परिणाम

By admin | Published: August 05, 2015 3:28 AM

दौंड तालुक्यात ठिकठिकाणी पॅनलव्यतिरिक्त सोईनुसार हातमिळवणी केल्यामुळे कुठल्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दौंड : दौंड तालुक्यात ठिकठिकाणी पॅनलव्यतिरिक्त सोईनुसार हातमिळवणी केल्यामुळे कुठल्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, स्थानिक गावपातळीवर ही निवडणूक असल्यामुळे मतदारांनीही सोईनुसार मतदान करून मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाले. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोर उमेदवार यांची चांगलीच चलती राहील, असे ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात बोलले जात होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सरपंचपदासाठी अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागतील, असे झालेल्या मतदानावरून स्पष्ट होत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. साधारणत: ११ वाजेपर्यंत १० टक्क्यांच्या जवळपास काही ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्यानंतर साधारणत: दुपारी २ नंतर मतदारांचा ओघ वाढला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. लिंगाळी ग्रामपंचायतीच्या दौंड येथील तुकडोजी हायस्कूल येथील मतदान केंद्र १२ वाजेपर्यंत ओस पडलेले होते. त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना जांभया देण्याशिवाय पर्याय नव्हता. काही मतदान केंद्रावर १०० वयाच्या वृद्ध महिलांनी मतदान केले. विशेषत: पाटस, वडगावदरेकर या मतदान केंद्रांवर ही परिस्थिती होती.