पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नवलाखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय अर्जावर निकाल देणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाने नवलाखा यांना दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनाचा अर्जावर त्वरित सुनावणी घेऊन निकाल देण्यात यावा, असा युक्तिवाद यावेळी अॅड. चौधरी यांनी केला. मात्र जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी संबंधित अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. मंगळवारी उशिराने अर्ज मिळाला असून त्याबाबत तपास अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तसेच अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती अॅड. पवार यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने या अर्जावरील आणि युक्तिवाद काल गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.
गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 5:54 PM