शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

‘परमेश्वराला रिटायर करा’वर अखेरपर्यंत ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 5:03 AM

डॉ. श्रीराम लागू : वयाच्या ९२व्या वर्षात पदार्पण करताना वैचारिक कणखरता

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘परमेश्वराला रिटायर करा’ या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागे घेण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वर हा केवळ माणसाच्या डोक्यात चाललेला विचार आहे, असे मला वाटते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे समाजाच्या सध्याच्या अवनत अवस्थेवर पडलेला प्रकाशझोत आहे, असे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. लागू यांचा शुक्रवारी ९१वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना नाटक, चित्रपटक्षेत्रात केलेली मुशाफिरी, कलाक्षेत्रातील राजकारणाच्या हस्तक्षेपाला असलेला ठाम विरोध, ‘मी नास्तिक आहे’ अशी खंबीर भूमिका, असे नानाविध कंगोरे उलगडले. वयाच्या ९२व्या वर्षात पदार्पण करत असताना स्वत:कडेच तटस्थतेने पाहण्याच्या त्यांच्या विलक्षण दृष्टीची प्रचीती आली. ‘मला हॅम्लेटची भूमिका करायला नक्की आवडली असती,’ असे सांगताना डॉ. लागू यांच्या चेहऱ्यावरील आविर्भावाने त्यांच्यातील अभिनेता अद्यापही जागा असल्याची साक्ष दिली. डॉ. लागू म्हणाले, ‘‘कलाकृतीला विरोध करण्याचे झुंडशाहीचे वातावरण पूर्वी होते आणि आजही तसेच आहे. ही झुंडशाही नव्हे, तर विशिष्ट व्यक्तींचे मूळ रूपच आहे. समाजाला हा कायम त्रास देणारा हा विषय आहे. एखादी कलाकृती आवडली नाही, तर त्याविरोधात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विरोध म्हणून नाटक, सिनेमा बंद पाडणे, धमकी देणे हा प्रकार अजिबात क्षम्य नाही. त्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. तू धमकी देतोस, म्हणजे स्वत:ला कोण समजतोस? अशी गुंडगिरी चालवूनच घेतली जाणार नाही. राजकारणाचा कलाक्षेत्रातील हस्तक्षेप मला कधीच मान्य नव्हता.याला मी सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहे. आम्ही चुकत असूही, त्यातून सुधारणा करू. मात्र, राजकारणाने अजिबात हस्तक्षेप करता कामा नये, असेही डॉ. लागू यांनी ठामपणे सांगितले. ‘मला कायमच अवघड भूमिकांनी भूरळ घातली. अनेक भूमिका करायच्या राहून गेल्या, असे वाटते. त्यातही मला ‘हॅम्लेट’ची भूमिका साकारायला नक्कीच आवडली असती,’ असेही ते म्हणाले.प्रेक्षकांनी नैसर्गिकअभिनय स्वीकारलायाला मी निमित्तमात्रप्रेक्षक नेहमी प्रगल्भ असतोच. काशिनाथ घाणेकर यांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. प्रेक्षकांनी त्यांच्यावर कमालीचे प्रेम केले. नैसर्गिक अभिनय आणि प्रेक्षकांच्या आहारी जाऊन केलेला अभिनय असे दोन प्रकार असतात. सुरुवातीला प्रेक्षकांना भडक अभिनय हवा होता; पण काही काळाने रसिकांनी नैसर्गिक अभिनयाला आपलेसे केले आणि भडक अभिनयाकडे पाठ फिरवली.या बदलाला मी केवळ निमित्तमात्र ठरलो, अशी भावना डॉ. श्रीराम लागूयांनी व्यक्त केली.(पूर्वप्रसिद्धी : १६ नोव्हेंबर २0१८)

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागू