शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

निवृत्त एसीपी भानुप्रताप बर्गे शिवाजीनगरमधून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:51 PM

पुण्यात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे इतके बॅनर लागण्याची ही पहिलीच वेळ होती़. तेव्हाच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सुचित होत होते़.... 

पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडून निवडणुक लढविण्याच्या तयारीत असलेले निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे़. भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे़. दोन महिन्यांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे अनेक बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले होते़. पुण्यात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे इतके बॅनर लागण्याची ही पहिलीच वेळ होती़. तेव्हाच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सुचित होत होते़. ३१ जुलै रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी भानुप्रताप बर्गे यांनी अन्य काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती़. त्यामुळे पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती़. मात्र, आज भाजपाच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली़. त्यात सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्यात आले आहे़. त्यानंतर भाजपाच्या सन्मान हॉटेल येथील कार्यालयासमोर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन घराणेशाहीला विरोध केला आहे़. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते़. भानुप्रताप बर्गे यांनी पुणे शहर पोलीस दलात अनेक वर्षे काम केले आहे़. तसेच दहशतवाद विरोधी पथकात काम करीत असताना त्यांनी शाळा, महाविद्यालये, तसेच विविध संस्थांशी संपर्क साधत दहशतवाद विरोधात जनजागृती करुन लोकसंग्रह केला आहे़ त्यामुळे सर्व समाजातील तरुणवर्ग त्यांच्याशी जोडला गेलेला आहे़. उमेदवारी अर्ज आताच घेतला असल्याचे सांगून आपण निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहे़. सर्वांशी बोलून ठरविणार असल्याचे भानूप्रतास बर्गे यांनी सांगितले़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा