पुणे : शहर पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते (वय ६१) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (दि.२६ ) निधन झाले. काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मोहिते यांच्या कारकिर्दीची सुरूवात शहर पोलीस दलातूनच झाली. येरवडा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून त्यांची पहिली पोस्टींग झाल्यानंतर पुण्यात पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले. पुणे, ग्रामीण, मुंबईसह इतर शहरातही त्यांनी काम केले.
कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते दीड वर्षांपूर्वीच निवृत्त झाले. अत्यंत मनमिळाऊ आणि कामात चपळ अशी त्यांची पोलीस दलात ख्याती होती. त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.