पुणे : निवृत्त पोलीस उपअधीक्षक मधुकर पं. मोटे (वय ७१) यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची उपचारादरम्यानच प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मधुकर पोटे हे पोलीस खात्यात कनिष्ठ पदावर भरती झाले. १९७८ मध्ये पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय, नाशिक येथून ते पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर पुणे शहर, पुणे ग्रामीण, लोहमार्ग, पुणे, ठाणे, कोल्हापूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे ते कार्यरत राहिले. अत्यंत यशस्वीपणे व निष्ठेने निष्कलंक सेवा बजावून पोलीस उपअधीक्षक म्हणून ते निवृत्त झाले. पोलीस खात्यातील या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या ‘गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा’ व त्यानंतर ‘वैशिष्ट्य पूर्ण पोलीस सेवा’ या प्रतिष्ठेच्या पोलीस पदकांनी सन्मानित केले होते.
अत्यंत लोकप्रिय, कार्यक्षम व निष्ठेने काम करणारे मुरब्बी अधिकारी अशी त्यांची पोलीस खात्यात व जनमानसात ओळख होती. निवृत्तीनंतर ही ते एका खाजगी संस्थेत अखेरपर्यंत कार्यरत होते. तसेच ‘योगा व प्राणायाम’ याचा त्यांनी मनापासून अंगीकार करून त्याचा प्रचारही केला.
फोटो - मधुकर मोटे