सरपंच व उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान झाले. सरपंचपदासाठी नेहेरे यांना १७ पैकी १२ मते, तर उपसरपंचपदासाठीदेखील १२ मते मिळाली. या वेळी निवडणूक अधिकारी एच. ए. सोनवणे व त्यांचे सहायक अधिकारी बी. एस. राठोड यांनी काम पाहिले.
खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत आहे. सरपंचपदासाठी दीड महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीपासूनच सर्वांनाच उत्सुकता होती. कडूस ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलाल, भंडारा उधळून साऱ्या गावात जल्लोष व्यक्त केला. गावच्या विकासासाठी वादविवादात गुंतून न राहता प्राधान्य क्रमाने पायाभूत सुविधांबरोबर इतर सर्व विभागांच्या कामांवर भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच निवृत्ती नेहेरे व उपसरपंच कैलास मुसळे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक शेंडे, कांचन ढमाले, युवा नेते उद्योजक प्रताप ढमाले, बाळासाहेब धायबर, पंडित मोढवे, माऊली माऊली ढमाले,अभिनाथ शेंडे, बाळासाहेब बोंबले, मारूती जाधव, बबलू शेख, आनंदराव पानमंद नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या.
२५ कडूस नेहेरे
२५ कडूस मुसळे