शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

मुद्देमालचा अपहार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यातील २ निवृत्त पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:42 PM

सहकारनगर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात काम करताना लाखो रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणाऱ्या दोघा निवृत्त सहायक फौजदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देमनोहर नेतेकर (वय ६०) आणि जयवंत पाटील (वय ५९) अशी त्यांची नावे अटक करुन त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार रुपये पोलिसांनी केले हस्तगत

पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात काम करताना लाखो रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणाऱ्या दोघा निवृत्त सहायक फौजदारांना पोलिसांनी अटक केली आहे.मनोहर गंगाराम नेतेकर (वय ६०, रा़ आंबाई अपार्टमेंट, धायरी) आणि जयवंत अमृत पाटील (वय ५९, रा़ भारत कॉलनी, कर्वेनगर) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांची सहकारी पोलीस हवालदार अलका गजानन इंगळे (वय ५२, रा़ महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, बिबवेवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ सहकारनगर पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून म्हणून नेमणूकीला असताना २००४ ते ३१आॅगस्ट २०१७ दरम्यान त्यांनी रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करुन न्यायालयाचा आदेश नसताना मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावली़ तशा खोट्या नोंदी करुन खाडाखोड करुन बनावट दस्तावेज तयार केले़ त्याद्वारे ४ लाख ८ हजार ५०६ रुपये रोख, २२ मोबाईल, २३ वाहने, एक लॅपटॉप, २ इलेक्ट्रिक मीटर यांचा अपहार केला होता़ त्यांनी न्यायालयाचा आदेश नसताना परस्पर वाहनांचा लिलाव करुन त्यांची विक्री केली होती़ नेतेकर हे २०१६ मध्ये तर जयवंत पाटील हे ३१ आॅगस्ट २०१७ रोजी निवृत्त झाले होते़ अलका इंगळे यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे़ त्यानंतर ही जबाबदारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार रुपये हस्तगत केले आहेत़ न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरPuneपुणे