सैनिकी सेवेतून निवृत्त झालेले बाळासाहेब किसन जगताप यांचे स्वागत मांडकी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील जगताप यांच्या आगमनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत जगताप यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
जगताप यांनी बिहार राज्यातील गया येथे सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर सलग १७ वर्षे सैन्यात देशसेवा केली.
जम्मू काश्मीर, श्रीनगर, बरेली, राजस्थान, आसाम व शेवटी पंजाब येथे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले.
नुकतेच ते निवृत्तीनंतर आपल्या मूळगाव असलेल्या पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे आले. त्यांचे स्वागत मांडकी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका शिंदे, उपसरपंच विश्वास जगताप, पोलीस पाटील प्रवीण जगताप, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे संचालक मोहन जगताप, बाबा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन जगताप, लाला भंडलकर, संतोष जगताप, राहुल शिंदे, रामभाऊ भोसले व फौजी बाळासाहेब जगताप मित्र परिवारातील सदस्यांनी पुष्पहार घालून तसेच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. या वेळी भारतमाता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.