शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

नादुरुस्त मोबाइलचे पैसे ग्राहकाला परत करा : ग्राहकमंचाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:01 PM

मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता.

ठळक मुद्देनुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये देखील मिळणार

पुणे : नवीन मोबाइल सुरूच झाला नसल्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करणा-या कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराला मोबाइलचे ५ हजार १४८ रुपये परत द्यावे. त्याचबरोबर ५ हजार रुपयांची नुकसानभरपाई, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष वाय. डी. शिंदे, सदस्या क्षितीजा कुलकर्णी यांनी हा दावा निकाली काढला.           साजिद झैनीउद्दीन काझी ( रा. शनिवार पेठ ) यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी शॉप सीजे नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ( स्टार सीजे प्लाझा, सहावा मजला, डॉ. डीबी मार्ग, ग्रॅन्ट रोड, मुंबई), कस्तुरी मेगा व्हेन्चर्स प्रा. लिमिटेडचे संचालक मयांक पाटीदार, काला पाटीदार ( लाला लजपतराय कॉलनी, एरिया कॉलनी, भोपाळ, मध्यप्रदेश), लावा इंटरनॅशनल लिमिटेड ( नोएडा, उत्तरप्रदेश), सिद्धीविनायक एंटरप्रायझेस, नितीन भोसले (झोलो सर्व्हिस सेंटर, अच्युत प्रसाद अपार्टमेंट, नळ स्टॉप) यांच्याविरुद्ध मंचाकडे तक्रार दाखल केली होती.         मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता. आॅर्डर दिल्यानंतर त्यांना २३ जानेवारी २०१७ रोजी मोबाइलची डिलीव्हरी मिळाली. मोबाइलचे पार्सल उघडले असता बिलावर त्यांचे आडनाव चुकीचे असल्याचे लक्षात आले. तसेच बिलावर सिरीयल नंबर आणि इएमइआय नंबर देखील नव्हता. मोबाइलच्या मॅन्युअलमध्ये देण्यात आलेल्या सूचनेनुसार त्यांनी फोन चार तास चार्जिंग केला. मात्र, तरीही मोबाइल सुरू झाला नाही. मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना त्याला हात लावल्यास करंट बसत होता. मोबाइलवर उत्पादनाची तारीख सप्टेंबर २०१४ होती.           हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला. त्यांना कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडे जाण्यास सांगितले. सेंटरमधून दोनदा मोबाइल बदलून देण्यात आला. मात्र तरीही मोबाइलम सुरू झाला नाही. याबाबत संबंधितांकडे वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काझी यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.तक्रारदार यांनी मंचाकडे प्रतिज्ञापत्र आणि संबंधित कागदपत्रे दाखल केली. विरुद्ध पक्षाकडे मेलद्वारे साधण्यात आलेल्या संपर्काची छापील प्रतही त्यांनी दाखल केली. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदाराला सेवा देताना त्रुटी राहिली असल्याचे दिसून येते. त्यामुळे  मंचाने मोबाइलची रक्कम, नुकसान भरपाई म्हणून ५ हजार आणि तक्रारीचा  ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलCourtन्यायालय