पुणे : आर्थिक व सायबर गुन्ह्यात तातडीने कारवाई करुन सायबर क्राईम सेलने ५ गुन्ह्यातील ८२ हजार ५३९ रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिले़ जीवनसाथी या मेट्रोमनी साईटवर दोन प्रकरणात भरलेले पैसेही रिफंड करण्यात आले आहेत.संजय हराळे यांच्या क्रेडिट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार होऊन त्यांची २३ हजार २७९ रुपयांची फसवणूक झाली होती. सिटी बँकेशी तत्काळ पत्रव्यवहार करुन त्यांना हे पैसे परत मिळवून देण्यात आले. कल्पेश देवकाते हे ऑनलाईन आफ्रिकन पक्षी खरेदी करीत असताना त्यांना एकाने त्याच्या खात्यावर २२ हजार रुपये भरायला लावून फसवणूक केली होती. त्यांना ती रक्कम परत मिळाली़ शिरीन खान यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे असताना ३० हजार २६० रुपयांचे व्यवहार झाले होते.रोहित श्रॉफ यांनी जीवनसाथी या मॅट्रोमनी साईटवर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्यांची ३ हजार रुपये व शेख रशीद यांची ४ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. दोघांनाही पैसे मिळवून देण्यात आले.
मॅट्रोमनी साईटवरुन झालेल्या फसवणूकीची रक्कम सायबर क्राईम सेलने दिली परत मिळवून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:05 PM
संजय हराळे यांच्या क्रेडिट कार्डवरुन अनधिकृत व्यवहार होऊन त्यांची २३ हजार २७९ रुपयांची फसवणूक झाली होती.
ठळक मुद्देजीवनसाथी या मेट्रोमनी साईटवर दोन प्रकरणात भरलेले पैसेही रिफंड