गराडे : वाघापूर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी रेवती चांगदेव कुंजीर व उपसरपंचपदी सौरभ शेखर कुंजीर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती जगताप यांनी केली. सहायक म्हणून ग्रामसेविका विजया भगत यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपाली रमेश कुंजीर, कोमल किरण कुंजीर, ताई सुरेश कुंजीर व शंकर तुळशीराम कड नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, पुरंदर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता कोलते, विठ्ठल मोकाशी, गणेश जगताप, गौरी कुंजीर, बाजीराव कुंजीर, बापूसाहेब कुंजीर, प्रदीप कुंजीर, गौतम कुंजीर, रावसाहेब कुंजीर, नितीन कुंजीर, कैलास कुंजीर, संतोष कुंजीर, माऊली कुंजीर, आबासाहेब मचाले, अशोक कुंजीर, भालचंद्र कुंजीर, अमोल कुंजीर, हनुमंत कुंजीर, चंद्रकांत कुंजीर आदीसह वाघापूरकर ग्रामस्थ उपस्थित होते.
पॅनल प्रमुख बाजीराव कुंजीर, बापूसाहेब कुंजीर, नितीन कुंजीर, प्रदीप कुंजीर, विकास इंदलकर, कृष्णा इंदलकर, बाळासाहेब कुंजीर, सुनील कुंजीर, गौरी कुंजीर, विकास इंदलकर उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक : ११गराडे वाघापूर सरपंच निवड
फोटोओळी : वाघापूर (ता. पुरंदर) येथे सरपंच रेवती कुंजीर व उपसरपंच सौरभ कुंजीर यांच्या बिनविरोध निवडप्रसंगी दत्तात्रय झुरंगे, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, बाजीराव कुंजीर.