पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे कारेगाव येथील बनावट डॉक्टरचे अनेक प्रताप समोर येत असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत चंदन सुभाष नारखेडे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत महेश किसन पाटील (मेहमूद फारुक शेख) रा. पीर बुऱ्हाणपूर, जि. नांदेड) या बनावट डॉक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे , फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून १२ जुलै २०१९ ते आजपर्यंत फिर्यादीकडून कारेगाव, ता. शिरूर येथे जमीन गट नंबर २८५ मधील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारतीमधील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलचे ताब्यातील एक गाळा मेडिकलसाठी चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर देतो, असे बनावट डॉक्टर महेश किसन पाटील (मेहमूद फारुक शेख) याने सांगून दिनांक १२ जुलै २०१९ ला तीस लाख रुपये घेऊन आजपर्यंत गाळा ताब्यात न देता गाळ्यासाठी घेतलेल्या ३० लाखांपैकी २४ लाख रुपये आजपर्यंत न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहे.