शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

वर्षभरात ११0 कोटींचा महसूल

By admin | Published: January 08, 2016 1:42 AM

अनधिकृत गौणखनिज उत्खनन, वाहतूक व रॉयल्टीच्या माध्यमातून ३१ डिसेंबरअखेर शासनाने जिल्ह्यातून तब्बल ११० कोटींचा महसूल जमा केला आहे

लोणी काळभोर : अनधिकृत गौणखनिज उत्खनन, वाहतूक व रॉयल्टीच्या माध्यमातून ३१ डिसेंबरअखेर शासनाने जिल्ह्यातून तब्बल ११० कोटींचा महसूल जमा केला आहे. यामध्ये हवेलीचा वाटा ७५ कोटी ३६ लाख ८१ हजारांचा असून, अव्वल स्थान मिळविले आहे. त्यानंतर दौंड तालुका असून ११ कोटी २० लाख ४५ हजार ७५२ रुपये जमा झाले आहेत. तर, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्यातून ८ लाख २७ हजार ६२४ रुपये व भोर तालुक्यातून ७० लाख ७ हजार रुपये महसूल जमा झाला आहे.हवेली तालुक्याला पुणे जिल्ह्यातील दगडखाणीचे आगार समजले जाते. वाघोली, भावडी, लोणीकंद, नांदोशी, येवलेवाडी व मांगडेवाडी या गावांच्या परिसरात मोठ्या दगडखाणी आहेत. राजकारणात मातब्बर असलेल्या अनेक नेत्यांची दगडखाण, स्टोन क्रशर संघटना हवेलीत असल्यामुळे त्यांचा वेगळाच दबदबा या व्यवसायात कायम आहे. मात्र, हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार दगडू कुंभार यांच्या आदेशानुसार महसूल पथकाने दगडखाणीची मोजणी करून दंडात्मक कारवाई केल्याने कोट्यवधीचा महसूल तिजोरीत जमा होऊ लागला आहे. वाळू माफियांवर कारवाईचा फास आवळून भर टाकली आहे. (वार्ताहर)दौंड परिसरातील भीमा नदीपात्रातून २२ बोटी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली. दरम्यान, गेल्या महिनाभरात बेकायदेशीर वाळूउपसा करणारे १0 जेसीबी, ३६ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. ३६ वाहनांच्या पोटी ३५ लाख रुपये दंड वसूल झाला असून, १ एप्रिल ते आजपावेतो ४८६ वाहनांवर कारवाई करून २ कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.महसूल खात्याने वाळूमाफियांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कानगाव, शिरापूर, खानोटा या परिसरातील भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी जप्त करून, त्या तहसील कचेरीच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबरीने जप्त केलेली वाळूची वाहने तहसील कचेरी परिसरात असल्याने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची जत्राच भरली असल्याचे चित्र आहे. वाळूमाफियांची मुजोरी मोडीत काढणारदौंड तालुक्यात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती वेळोवेळी मिळत असल्याने त्यानुसार महसूल खात्याचे पथक तातडीने घटनास्थळी जाऊन वाहने जप्त करण्याचे कामकाज करीत आहेत. त्यानुसार मी स्वत: आणि नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके आणि महसूल विभागाचे कर्मचाऱ्याचे एक पथक नेमण्यात आले असून, त्यानुसार अवैध वाळूउपशावर टेहाळणी करीत आहेत. भविष्यात कुठल्याही वाळू माफियांची मुजोरी मोडीत काढणार, परिणामी त्यांना आळा बसविल्याशिवाय महसूल खाते गप्प बसणार नाही, असे तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले. वाळूमाफियांचा फास आवळलाजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या नियोजनाखाली झालेल्या बैठकीत कडक कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींकडून वाळू माफियांना आवर घालण्याची मागणी होऊ लागल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.सर्वाधिक वाळूचोरी होणाऱ्या भागात तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार होणार असून ते वाळूचोरी रोखण्यासाठी गस्त घालतील. वाळू माफियांना लगाम घालण्यासाठी, चोरीची वाळू रस्त्यांवर येण्यापूर्वीच उत्खनन करतानाच संबंधितावर कारवाई होणार असल्याने अजूनही जिल्ह्यातून दंडात्मक महसूल वाढण्याची शक्यता आहे.- शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिकर्म विभागप्रमुख