शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महसूल विभाग एकाकी

By admin | Published: November 11, 2015 1:31 AM

लिलाव झालेले नसतानाही अनधिकृतपणे वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी काही महिन्यांपासून महसूल विभाग करीत असलेल्या धडक कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे

लोणी काळभोर : लिलाव झालेले नसतानाही अनधिकृतपणे वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी काही महिन्यांपासून महसूल विभाग करीत असलेल्या धडक कारवाईमुळे कोट्यवधी रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. मात्र, यामध्ये पोलीस व परिवहन विभागाचे आवश्यक तेवढे सहकार्य वेळेवर मिळत नसल्याने महसूल विभागावर अतिरिक्त ताण येत आहे. महसूल, गृह व परिवहन विभागात आवश्यक समन्वय नसल्यामुळे या खात्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे जाणवत असून, ठराविक खात्यास प्रतिमहा मिळणारी चिरीमिरी व कार्ड पद्धतीमुळे वाळूमाफिया मुजोर झाले आहेत. यामुळेच सध्या निर्धास्तपणे चालू असलेली अनधिकृत वाळू वाहतूक बंद होणे अशक्य ठरत आहे. आर्थिक स्रोतामुळेच पोलीस व परिवहन विभाग महसूलच्या कारवाईकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. चोरट्या वाळू उत्खननामधून मिळणाऱ्या अमाप मायेची आकडेवारी डोळे दीपवणारी आहे. कारवाई केली तर आपल्या मासिक प्राप्तीचे काय? या प्रश्नचिन्हामुळे अनेक विभागाचे अधिकारी हतबल झाले आहेत. महसूल, गृह व परिवहन विभागाने सयुक्तिक वाळू माफियाविरोधात कारवाई केल्यास या व्यवसायाचे समूळ उच्चाटन होईल, मात्र या विभागामध्ये समन्वय आवश्यक आहे. महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयातील आदेशानुसार अनधिकृतपणे गौणखनिज उत्खनन वाहतूकप्रकरणी कारवाया सुरू आहेत. महसूल विभागाकडे पुरेसे कर्मचारी व मनुष्यबळ नसतानाही, मस्तवाल वाळूमाफिया व वाहतूकदारांना लगाम घालून दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे अनेकदा महसूल अधिकाऱ्याना शिवीगाळ, दमदाटी व अंगावर गाड्या घालण्याचे प्रकारही झालेले आहेत. मात्र, याला न जुमानता महसूल विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. परंतु त्यांना परिवहन व गृह विभागाची आवश्यक तेवढी साथ न मिळाल्यामुळे ही अनधिकृत वाळू वाहतूक महसूल विभागाच्या दृष्टीने दुर्दैवी अपघात ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक महसूल जमा करताना गंभीरपणे या गोष्टींकडेही लक्ष देणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या व्यवसायातील वाढती गुन्हेगारीची प्रवृत्ती व स्पर्धा याला कारणीभूत ठरू लागल्याची चिन्हे आहेत. दंड न भरणाऱ्या वाहनाचा जप्ती पंचनामा करून संबंधित वाहन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडे वाहने स्वाधीन करावी लागतात. पळून गेलेल्या वाहनांच्या नंबरच्या आधारे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या वाहनांवर कोणता विभाग काय कारवाई करतो, हे अद्यापही न उलगडणारे कोडे आहे. गाडी रस्त्यावर सोडून पळून गेलेल्या वाहकाच्या गाडीवर कशी कारवाई करणार? व ती गाडी चावी व ड्रायव्हर नसताना पोलीस स्टेशनला कशी जमा करावयाची? या व अशा असंख्य विवंचनेतून महसूल पथक कारवाई सुरूच ठेवते. यामध्ये महसूल पथकाचे कसब पणास लागत असल्यामुळे महसूल अधिकारीही हैराण झाले आहेत. (वार्ताहर)वारंवार पोलीस विभागाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गाड्या घालण्याचे व धमकावण्याचे प्रकार होत असल्यामुळे महसूल विभागाने पोलिसांची मदत घेऊन कारवाई केल्यास वाळूमाफियांवर अंकुश ठेवला जाईल व जे अनधिकृत वाळू वाहतूकदार पळून जातात त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. याकामी प्रसंगी परिवहन विभागाची मदत घेतली जाईल. - वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली महसूल विभागाकडे कामाचा अतिरिक्त ताण असूनही हा विभाग कमी कर्मचाऱ्यांसोबत वाळू व इतर गौणखनिज उत्खनन वाहतूक प्रकरणी कारवाई करीत आहे. त्यांना गृह व परिवहन विभागाची साथ लाभली, तर महसूलच्या दंडात्मक रकमेत वाढ होईल. यामुळे गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणे सुलभ होईल. सध्या वाळूचे लिलाव झाले नसल्यामुळे वाळूची होणारी चोरी रोखण्यासाठी आम्ही सातत्याने कारवाई सुरू ठेवणार आहे.- स्नेहल बर्गे, उपविभागीय महसूल अधिकारी, हवेलीमहसूल विभागाने आगाऊ कल्पना दिल्यास आमचे पथक पाठवून कारवाईस निश्चित सहकार्य केले जाईल. तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिले असून, आम्हीही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत आहोत. महसूलच्या कारवाईप्रसंगी पळून गेलेल्या वाहनांचे नंबर आमच्याकडे प्राप्त झाल्याने या वाहनांच्या कागदपत्रांवर बोजा दाखल करून वाहन ताब्यात घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. - जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे