डिजिटल युगात सहज सेवा उपलब्धतेसाठी महसूल विभाग कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:24 PM2021-08-01T20:24:48+5:302021-08-01T20:29:29+5:30

महसूल दिनानिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण करण्यात आले.

Revenue Department committed to easy service availability in the digital age; Opinion of Balasaheb Thorat | डिजिटल युगात सहज सेवा उपलब्धतेसाठी महसूल विभाग कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांचे मत

डिजिटल युगात सहज सेवा उपलब्धतेसाठी महसूल विभाग कटिबद्ध; बाळासाहेब थोरात यांचे मत

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात आजपासून नव्या स्वरूपात सातबारा देणारराज्यात आता तलाठ्यांच्या ऐवजी प्रत्येक शेतकरीच ई-पीक पाहणीची नोंदणी करणार

 पुणे : राज्यात आजपासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

महसूल दिनानिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण करण्यात आले. तर महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.

विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पीकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्वपूर्ण योगदान असणार आहे.

ई-पीक पाहणी आता शेतकरीच नोंदवणार 

राज्यात आता तलाठ्यांच्या ऐवजी प्रत्येक शेतकरीच ई-पीक पाहणीची नोंदणी करणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. तसेच काही कायदे रद्दही करावे लागतात. येणाऱ्या काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Revenue Department committed to easy service availability in the digital age; Opinion of Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.