पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

By राजू इनामदार | Published: October 25, 2024 03:44 PM2024-10-25T15:44:45+5:302024-10-25T15:45:12+5:30

कसबा विधानसभेत रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने व्यवहारेंनी बंडखोरीचा निर्णय घेतला

Revolt of Pune first mayor Kamal vyvhare from Congress Joining the Swarajya Party | पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

पुणे: शहराच्या पहिल्या महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे काँग्रेसमधून बंडखोरी करून कसबा विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. स्वराज्य पक्षात प्रवेश करून त्या सोमवारी (दि.२८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. स्वराज्य पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या परिवर्तन महाशक्ती च्या उमेदवार असतील.

कमल व्यवहारे गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्या शहराच्या पहिल्या महिला महापौर होत्या. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कसबा विधानसभेमधून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. २०१९ मध्येही त्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. यावेळीही त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने तिथे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांनाच उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला.

गुरूवारी सकाळी त्यांनी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्याचवेळी त्या बंडखोरी करणार असल्याची चर्चा सुरू झाली. लोकमत बरोबर बोलताना त्यांनी शुक्रवारी स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला असल्याचे सांगितले. सोमवारी (दि.२८) आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Web Title: Revolt of Pune first mayor Kamal vyvhare from Congress Joining the Swarajya Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.