क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला पुण्यात क्रांती मार्च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:45 PM2018-08-08T21:45:00+5:302018-08-08T21:46:36+5:30
काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला
पुणे: काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला. . हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या वंशातील धनंजय दाभाडे तसेच पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे मोर्चाच्या अग्रभागी होते. क्रांती दिन चिरायू होवो अशा घोषणा देत स्टेडियमपासून सुरू झालेला मार्च जुना मोटार स्टँड, चुडामण तालीम, एमजी रस्ता, कोहिनूर चौकापर्यंत आला.
आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, नगरसेवक आबा बागूल, अविनाश बागवे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. महिला नगरसेविका लता राजगूरू, वैशाली मराठे, चांदबी नदाफ, कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांनीही यात सहभाग नोंदवला. माजी आमदार उल्हास पवार यांचे प्रमुख भाषण झाले. अन्य वक्त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या आठवणींना उजाळा दिला. रमेश बागवे यांनी प्रास्तविक केले.