पुणे : पडद्यावर आपल्या उत्तुंग अभिनयाने भारावून टाकलेल्या कलाकारांनी प्रत्यक्ष दिलेले दर्शन आणि त्यानंतर सुरू झालेली स्वरांची यात्रा आणि जुगलबंदी यांनी प्रेक्षक भारावून गेले. दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मराठी रसिकांना दिलेल्या या स्वरकट्यारीची प्रेक्षकांनी याचि देही, याची डोळा तल्लीनतेने अनुभूती घेतली. मराठी चित्रपटांना लोकव्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकमत सीएनएक्स’तर्फे प्रिमीयरचे शोचे आयोजन केले जाते. याअंतर्गतच ‘कट्यार काळजात घुसली’ च्या प्रिमीयरचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेता- दिग्दर्शक सुबोध भावे, झी स्टुडिओचे प्रमुख नितीन केणी, एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने, निर्माते सुनील फडतरे, सहदिग्दर्शक वैभव चिंचाळकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, गायक महेश काळे उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी ‘दीपोत्सव’ देऊन कलाकारांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे आणि ‘लोकमत’ने त्याचा प्रिमीयर आयोजित केल्याचा एक विलक्षण आनंद आहे. सर्वच कलाकारांनाही या खास शो ला बोलावल्याबद्दल ‘लोकमत’चे मनापासून आभार.- सुबोध भावे, दिग्दर्शक‘लोकमत’ने हा प्रिमीयर आयोजित करून खूप चांगले काम केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’च्या टीमला त्यांच्या परिवारात सामावून घेतल्याबद्दल ‘लोकमत’चे खूप धन्यवाद. - सचिन पिळगावकर, अभिनेताकलाकार स्वत:चा जीव ओतून चित्रपटात काम करतात, पण ती प्रेक्षकांंपर्यंत पोचलीच नाही, तर घेतलेली मेहनत फुकट गेल्यासारखंच असतं. चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याच महत्त्वाचं काम मीडियाचं असतं. ते मुख्य काम ‘लोकमत’ खूप चांगल्या पद्धतीने करत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे.-अमृता खानविलकर, अभिनेत्री‘लोकमत’ या उपक्रमातून मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला चांगला हातभार लावत आहे. शास्त्रीय संगीत आपला वारसा आहे आणि तो वारसा जपण्याच्या दृष्टीने आणि लोकांबरोबर शेअर करण्याच्या हेतूने ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. - महेश काळे, गायकमराठी चित्रपट, मालिका किंवा नाटकांना प्रमोशनची खूप गरज असते. त्यात हिंदीच्या तुलनेत मराठी फिल्म इंडस्ट्रीचे प्रमोशन थोडे कमी पडते. पण, ‘लोकमत’मुळे इंडस्ट्रीतल्या घडामोडी शहरांपुरता मर्यादित न राहता लहान लहान गावातही पोहचू शकत आहेत. याचा खूप फायदा मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी होत आहे.- निखिल साने, बिझनेस हेड, एस्सेल व्हिजन
‘स्वरकट्यारी’ने रसिक भारावले
By admin | Published: November 15, 2015 1:05 AM