पुणो : शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आर्थिक हातभार मिळावा या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेचा भार दिवसेंदिवस वाढत आहे . 2क्1क्मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा पहिल्या वर्षी अवघा 93 लाख 33 हजार रुपये होता. तो या वर्षी डिसेंबर 2क्14अखेर तब्बल 17 कोटींच्या घरात पोहोचला आहे. तर अंदाजपत्रक संपण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी असल्याने या योजनेसाठी प्रशासनास सुमारे 3 कोटी रुपये लागणार आहेत. गरजवंतापेक्षा धनदांडग्यांकडूनच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना हाताशी धरले जात असल्याने ही वेळ ओढावली आहे.
या योजनेंतर्गत महापालिकेकडून एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांना शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये 1 लाख रुपयांर्पयतचे उपचार देण्यात येतात, तसेच तेवढय़ाच रकमेर्पयतची औषधे महापालिकेकडून दिली जातात. त्यासाठी संबंधित कार्डधारकास 1 लाख रुपयांर्पयतचा उत्पन्नाचा दाखल सादर करावा लागतो. सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने अनेकदा नगरसेवकांच्या शिफारसीने या योजनेचे पत्र महापालिकेकडून संबंधित कुटुंबास दिले जाते. 2क्1क्मध्ये या योजनेसाठी 4642 नोंदणी करण्यात आली होती. त्यातील सुमारे 613 जणांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यासाठी 93 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तर त्यासाठी तरतूद सुमारे 9 कोटी रुपयांची होती. त्यानंतर या योजनेचा खर्च दर वर्षी जवळपास दुपटीने वाढत 2क्11मध्ये हा खर्च 4 कोटींवर, 2क्12मध्ये 9 कोटींवर, 2क्13मध्ये 13 कोटींवर, तर डिसेंबर 2क्14अखेर 17 कोटींवर पोहोचला आहे. तर या वर्षीची अंदाजपत्रकातील तरतूद संपल्याने सुमारे 3 कोटी रुपयांची शहरातील काही रुग्णालयांची बिलेही थकीत आहेत.(प्रतिनिधी)
या वर्षी अंदाजपत्रकातील या योजनेसाठी 13 कोटींचा निधी संपल्याने या योजनेतील रुग्णांना मोठय़ा रुग्णालयांमध्ये सेवा मिळणो बंद झाले आहे. या निधीवरून स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि माजी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यात जुंपली आहे.
या योजनेसाठी अंदाजपत्रकात 3क् कोटींचा निधी मागण्यात आला होता. मात्र, मागील स्थायी समिती अध्यक्षांनी त्यास कात्री लावत ते 11 कोटी रुपयेच दिल्याने ही वेळ ओढावल्याचे कर्णे गुरुजी यांनी सांगितले. मात्र, त्याचा समाचार आज माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी घेतला, कर्णे गुरुजी यांनी अंदाजपत्रक न पाहताच वक्तव्य केले असल्याचे तांबे म्हणाले.
2क्14-15 या वर्षासाठी प्रशासनाने 3क् नव्हे, तर 15 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यात पालिका आयुक्तांनी दोन कोटी कमी केले होते. त्यानंतर काही रक्कम स्थायी समितीने कमी केली असल्याचे तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यानंतर पुन्हा आरोग्य विभागास 3 कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे या वर्षाची एकूण तरतूद 15 कोटीच असल्याचे तांबे म्हणाले.
असे वाढले शहरी गरीब
वर्ष प्रत्यक्ष खर्च अंदाजपत्रक तरतूद
2क्1क्93 लाख 4 कोटी
2क्11 -124 कोटी 7 कोटी
2क्12-139 कोटी 9 कोटी
2क्13-1413 कोटी 78 लाख 15 कोटी
डिसेंबर 2क्1413 कोटी 35 लाख 11 कोटी 5 लाख