पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात दिवसेंदिवस पार्ट्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने दारूच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाने सादर केलेल्या वार्षिक अहवालात गेल्या वर्षभरात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल आठ लाख लिटर दारूची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही वर्षांत मुंबईपेक्षा पुण्यातील पार्ट्यांची संख्या वाढू लागली आहे. या पार्ट्यांमध्ये इव्हेंट कंपन्यांना मोठा नफा मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय संगीत इव्हेंटचे प्रमाणही वाढले आहे. पुण्यात प्रामुख्याने कोरेगाव पार्क, मगरपट्टा, विमाननगर, बाणेर, कोंढवा, लोणावळा परिसरात आयटी कल्चरसाठी दर बुधवार, शनिवार आणि रविवार खास पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेक आयटी कंपन्या तर कर्मचाऱ्यांसाठी लोणावळा, पानशेत, खंडाळा येथे रिसॉर्ट बुक करून दोन दिवसांचे इव्हेंटच करतात. याशिवाय पार्टीसाठी व्हॅलेंटाईन डे, होळी, फे्रर्शर पार्टी, ख्रिसमस, न्यू एअरच्या नावाखाली पार्ट्यांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते.शहर आणि जिल्ह्यातील पार्ट्यांचे प्रमाण वाढल्याने मद्य विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये अवैध मद्य विक्रीचे प्रमाणही मोठे आहे.यामुळे गेल्या वर्षभरात उत्पादनशुल्क विभागाने अवैध दारू तयार करणे, विनापरवाना दारू विकणे, भेसळ करून दारू विकणे यासाठी १९ कोटी ३५ लाख ९ हजार रुपयांचा दंड केला आहे. (प्रतिनिधी)४पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सात कोटी ९७ लाख ४६ हजार लिटर दारूची विक्री झाली. यामध्ये तीन कोटी ६७ लाख ५३ हजार लिटर बिअर, देशी दारु दोन कोटी १३ हजार लिटर, विदेशी दारू दोन कोटी १९ लाख १४ हजार लिटर तर वाईनची ७६ हजार ८१ हजार ४३ लिटर विक्री झाली आहे. ४गेल्या दोन वर्षामध्ये दारूवरील कर वाढला असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे या वर्षी पुणे जिल्ह्यातून एक हजार कोटी पेक्षा जास्त महसूल जमा झाल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात वर्षात रिचवली ८ कोटी लिटर दारू
By admin | Published: February 17, 2015 11:32 PM