पिंपरी : डेंग्यूच्या नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जनजागृतीवर अधिक भर दिला असून, शहराच्या विविध भागात डेंग्यूच्या दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यासाठी ध्वनिक्षेपक लावून रिक्षा फिरविण्यात येत आहेत. ध्वनिक्षेपकावरून स्पष्ट ऐकू येत नाही. काही क्षणांत रिक्षा निघून जातात, त्या रिक्षांवर कसलेही जनजागृतीचे फलक नाहीत. केवळ रिक्षा फिरताहेत, जनजागृतीचे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
महापालिकेच्या विविध ठिकाणच्या आठ रुग्णालयांच्या अधिपत्याखाली त्या परिसरात डेंग्यूच्या जनजागृतीसाठी रिक्षा फिरविण्यात येत आहेत. विशिष्ट कालावधी निश्चित करून भाडय़ाने रिक्षा घेतलेल्या नाहीत. रोजचे रोज रिक्षा भाडेपट्टय़ावर ठरवून घेतल्या जात आहेत. रिक्षाचे रोजचे एक हजार रुपये भाडे, तर रिक्षावर लावण्यात येणा:या ध्वनिक्षेपक यंत्रणोसाठी एक हजार रुपये, प्रत्येक रिक्षावर वैद्यकीय विभागातील दोन व्यक्तींची नेमणूक अशा पद्धतीने रिक्षांद्वारे जनजागृतीचे नियोजन केले आहे. रोज नव्या रिक्षांचा शोध घेतला जात असल्याने त्या रिक्षांवर जनजागृतीचे फलक लावले जात नाहीत. ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षा डेंग्यूबाबत जनजागृती करतात हेसुद्धा सहज लक्षात येत नाही. जनजागृतीसाठी फिरविण्यात येणा:या रिक्षांवर रोज प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणो दिवसाला 16 हजार रुपये खर्च होत आहेत.
रिक्षांवर नेमण्यात आलेल्या कर्मचा:यांनी ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना डेंग्यूच्या दक्षतेबद्दल आवाहन करणो अपेक्षित आहे. परंतु स्वत:च्या आवाजातील रेकॉर्डिग माईकसमोर मोबाईल ठेवून ऐकविले जात आहे. त्यामुळे आवाज सुस्पष्ट
येत नाही. रस्त्याच्या कडेच्या भिंतींवर लावली असून जनजागृतीसाठी
सुमारे साडेतीनशे भिंती रंगवल्या आहेत. माहिती फलक ठिकठिकाणी लावले आहेत. (प्रतिनिधी)
4जनजागृतीसाठी महापालिकेने चार लाख पत्रके छापून घेतली आहेत. त्या पत्रकांचा दर्जा निकृष्ट आहे. वितरणाची यंत्रणासुद्धा सक्षम नाही. महापालिकेच्या बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी येणा:या रुग्णांच्या हातात पत्रके दिली जातात. महापालिकेच्या विविध आठ रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीने जमेल तसे पत्रक वाटपाचे काम सुरू आहे.
साडेतीनशे भिंती रंगविल्या
4डेंग्यूच्या दक्षतेबाबतची माहिती रस्त्याच्या कडेच्या भिंतींवर लावली
असून जनजागृतीसाठी सुमारे साडेतीनशे भिंती रंगवल्या आहेत.
माहिती फलक ठिकठिकाणी लावले आहेत. करसंकलन कार्यालये, खासगी इमारती या ठिकाणी असे फलक लावण्याचे नियोजन आहे.
शाळा-महाविद्यालयांतील विद्याथ्र्यासाठी गुरुवारपासून जनजागृती
अभियान सुरू केले आहे.
आज महापालिका पाळणार कोरडा दिवस
4महापालिकेने शनिवारी 15 नोव्हेंबरला कोरडा दिवस पाळण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी दिली. 13 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नागरिकांना करावे, अशी सूचना नगरसेवकांनी महापालिका प्रशासनास केली होती. परंतु सलग चार दिवस कोरडा दिवस पाळणो कठीण जाईल. म्हणून महापालिकेने केवळ एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे ठरवले आहे. या दिवशी नागरिकांनी पाण्याचा साठा करू नये.