पुणे : स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, अजून समाजातील अनेक घटकांना नीट जगता येईल अशी स्थिती नाही. जगण्याचा हा मुलभूत अधिकार देण्याला प्रत्येक सरकारचा अग्रक्रम हवा बुलेट ट्रेनला नाही असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केले. महाराष्ट्र बहुजन आघाडी लवकरच राष्ट्रीय बहुजन आघाडी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुजन आघाडीचा निर्धार मेळावा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी दुपारी झाला. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, मिलिंद पाखले, अलका जोशी तसेच अन्य अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. सावंत म्हणाले, राज्य घटनेत नवसमाज निर्मितीची कल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारीत असा समाज तयार करण्याचे ध्येय राज्यकर्त्यांसमोर होते, मात्र आपण सगळेच त्यांच्या तोंडाकडे पहात बसलो व त्यांनी काहीच केले नाही. आता महाराष्ट्र बहुजन आघाडी असा समाज निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही निवडणूका लढवू मात्र त्या सत्तेसाठी नाही, तर अशा समाजाच्या निर्मितीसाठीचकोळसे पाटील म्हणाले, काँग्रेस नको म्हणणाºयांना त्यांना चांगला पर्याय देणे जमले नाही. आता सत्तेवर आले आहेत, त्यांचे ध्येय समाजात फूट पाडण्याचे आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचाच आहेत, पण ते त्यांना मान्य नाही. फूटीच्या विचारावरच त्यांची संघटना उभी आहे. त्यांचा प्रतिवाद करायला हवा. मोदी, शाह हे फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी धोकादायक आहेत व हे जगातील अनेक विचारवंतांनी सांगितले आहे. काँग्रेस कश्ीही असली तरी त्यांनी समाजासाठी काम केले, कायदे केले. ते सगळे कायदे मोडण्याच्या प्रयत्नात सध्याचे सरकार आहे. त्यांचा प्रतिवाद करायला हवा.मिलिंद पाखले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत आणण्याची मागणी केली. वंचित विकास आघाडीचा फायदा भाजपाला झाला, त्यामुळेच आपण त्याआधीच त्यांचा राजीनामा दिला असे ते म्हणाले. अलका जोशी यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. सामान्यांना मोडीत काढून विशिष्ट वगार्चा विचार करून काम सुरू आहे असे त्या म्हणाल्या. नागेश चौधरी, मौलाना साकीद, शरफुद्दीन अहमद, हर्षवर्धन कोल्हापुरे उपस्थित होते. विशाल कदम यांनी सूत्रसंचालन केले.
जगण्याच्या अधिकाराला अग्रक्रम हवा, बुलेट ट्रेनला नाही : पी. बी. सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 7:47 PM
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, अजून समाजातील अनेक घटकांना नीट जगता येईल अशी स्थिती नाही.
ठळक मुद्देमहाराष्ट्र बहुजन आघाडी राष्ट्रीय करण्याचा निर्धार