पुणे : आपली विचारधारा मान्य नसलेल्या डॉ़. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करुन तो विचार संपणार नाही़, बंदुकीने प्रश्न सुटणार नाही. कारण ही विचारधारा चुकीची असून त्यांचे मारेकरी सापडले तरी उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल़. त्यामुळे यापुढेही सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे मत निवृत्त पोलीस महासंचालक एस़. एस़. विर्क यांनी व्यक्त केले़. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वातार्लाप कार्यक्रमात ते बोलत होते़.विर्क म्हणाले, अल कायदासारख्या दहशतवादी संघटना भारताबरोबरच अनेक देशात कार्यरत आहेत, ही चिंतेची बाब आहे़. काश्मीरमध्ये शेजारील राष्ट्र जेव्हा तेथील तरुणाईला हाताशी धरुन प्रॉक्सी वॉर खेळत आहे़. त्यात निष्पाप नागरिक, जवानांचा मृत्यु होत आहे़. तेथे काश्मिरी मुले त्यांच्या राज्यातील सुरक्षा रक्षकांबरोबर लढू लागले आहेत़. माणसाविरुद्ध माणूस अशी लढाई तेथे सुरु झाली आहे़.लष्कर किंवा सुरक्षा दले परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतात़. त्यावर राजकीय तोडगाच आवश्यक आहे़. लोकप्रिय सरकार जे करु शकते, ते राज्यपाल करु शकत नाही. आपल्या संविधानातही तसे स्पष्ट केले आहे़. पंजाबविषयी बोलताना ते म्हणाले, दहशवादाशी लढताना एक संपूर्ण पिढी बरबाद झाली़. त्यामुळे उद्योग आले नाही़. शेतीतील उत्पन्न कमी होत चालले़. त्यामुळे पुढच्या पिढीला नैराश्याने ग्रासले़. बेरोजगारी वाढली असून त्याचा परिणाम तरुणाई ड्रग्सच्या आहारी गेली आहे़. शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज हा सवयीचा भाग झाला आहे़. हे वातावरण दहशतवादाला पोषक बनत आहे़. त्याचा पंजाबबरोबरच हरियाना, हिमाचल प्रदेशालाही धोका आहे़.बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड येथील नक्षलवादावर उपाय योजना करण्यासाठी आदिवासींच्या सहकारी संस्था स्थापन करुन त्यांच्यापर्यंत विकास पोहचविला पाहिजे़. कॉपोर्रेट गुन्हेगारी हा अर्थ व्यवस्थेला मोठा धोका असे सांगून विर्क म्हणाले, दाऊद एखाद्याला धमकी देऊन १० कोटी हिसकावून घेतो़ त्याचवेळी कॉर्पोरेट गुन्हेगार हजारो कोटी रुपये घेऊन पलायन करतात़. पण त्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही़ अशा प्रकरणात त्यांचा सहभाग तपासण्याची गरज आहे़. त्याविरुद्ध सामुहिक मोहीम हाती घेण्याची गरज आहे़ कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोडा हा आपल्यासाठी अलर्ट आहे़. भविष्यात एखाद्याची छोटीशी चूक हजारोंना महाग पडण्याची शक्यता आहे़. हॉकर्सचा धोका मोठा असल्याचे त्यांनी सांगितले़.पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी विर्क यांचे स्वागत केले़. पांडुरंग सांडभोर यांनी प्रास्ताविक केले तर ब्रिजमोहन पाटील यांनी आभार मानले़. ...................सुधा भारद्वाज यांना शहरी नक्षलवादी म्हणणे चुकबंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, सुधा भारद्वाज यांना मी ओळखतो़. सहानभुतीदार असणे वेगळे आणि सहभाग असणे वेगळे़ त्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत़. त्यांना शहरी नक्षलवादी म्हणणे चुक आहे़. मात्र, महाराष्ट्र पोलीस चांगले होम वर्क करतात़. त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा असेल. त्यामुळेच त्यांनी ही कारवाई केली असावी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़.
................................
सर्जिकल स्टाईक खरंच यशस्वी झाला का?भारताने केलेले सर्जिकल स्टाईक खरंच यशस्वी झाला का याचा मी विचार करतो तेव्हा त्यानंतरच्या काळात दहशतवाद कमी झाला का ? लष्कराचे जवान, सुरक्षा रक्षक शहीद होत आहे़. सुरक्षा एजन्सींचे मनोबल कमी होताना दिसत आहे़. ही दीर्घकालीन लढाई आहे़. त्यामुळे ही चांगली परिस्थिती नाही़ त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक खरंच यशस्वी झाला का असा प्रश्न पडतो़.
...............
परवानगी घेऊन प्रेस नोट देता आली असतीडाव्या विचारसरणीच्या नेत्यांविषयी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविषयी ते म्हणाले, जर एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्यावर जाहीर मत व्यक्त करु नये़ पण जर पोलिसांच्या कारवाई विषयी लोकांचा गैरसमज होत असेल तर हा गैरसमज दूर करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली तर ते कधीच नाही म्हणणार नाहीत़ त्यामुळ न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांना प्रेसनोट देता आली असती, असे त्यांनी सांगितले़ ......................कोणाकडूनही गिफ्ट घेतले नाहीआपल्या पोलीस सेवा काळात दिवाळीला कोणाकडूनही गिफ्ट घेतले नाही़ पोलीस सेवेत दाखल झालो, त्याअगोदरपासून मित्र आहेत व आताही आहेत, अशाच लोकांकडून आपण भेटवस्तू स्वीकारल्या़ बदलीसाठी आपण कधीही कोणाला फोनाफोनी केली नाही़ बदलीचे पाकिट आल्यावर ते उघडून जेथे असेल तेथे गेलो़ पद तेच, काम तेच, गाडी, कर्मचारी तेच असताना केवळ रुम बदलणार असेल तर त्यासाठी का प्रयत्न करायचे असे त्यांनी सांगितले़ .......................* प्रसाद शुद्ध असेल तर देवतेकडून न्यायही शुद्ध मिळणार* गुन्हेगारी विषयक अभ्यास आवश्यक