शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

रिंगरोड अद्यापही हवेतच

By admin | Published: April 30, 2015 11:58 PM

शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे : शहर व परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रिंगरोडचा प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, यासाठी लागणारा तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा निधी कसा उभा करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे अद्यापही रिंग रोड हवेतच आहे. प्रशासनामार्फत सन २००७ मध्ये प्रथम रिंगरोडच्या रस्त्यांची आखणी करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षे यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आणि सन २००९ मध्ये शहराभोवतालच्या सुमारे १७० किलोमीटरचा रिंग रोड करण्याचे निश्चित करण्यात आले. या रस्त्यासाठी त्या वेळच्या दरपत्रकानुसार (डीएसआर) सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या रिंग रोडसाठी सुमारे सहा हजार एकर जमीन संपादित करावी लागणार असून, सर्वाधिक खर्च भूसंपादनासाठीच द्यावा लागणार आहे. हा रिंग रोड सहापदरी असणार असून, यामध्ये चारचाकी वाहने, पादचारी, सायकल ट्रॅक यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता या रिंग रोडमध्येच मेट्रो रेल्वे आणि बीआरटीसाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. दरम्यान, रिंगरोडची हद्द आणि पीएमआरडीएची हद्द जवळजवळ सारखीच आहे. त्यामुळे रिंगरोड प्रकल्पाची अंमलबजावणी पीएमआरडीएमार्फत होणार असल्याची चर्चा आहे. रिंगरोडमुळे पीएमआरडीएच्या हद्दी असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोमेंट यांच्याबरोबर लोणावळा, तळेगाव, शिरूर, भोर, सासवड आणि दौंड नगरपालिका यांच्या एकत्रित विकासाला चालना मिळेल.शहरावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने या रिंग रोडची आखणी करण्यात आली आहे. सध्या रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. अमेरिकेची एईकॉम एशिया लिमिटेड ही कंपनी सर्वेक्षणाचे काम करीत असून, प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये गेल्या दहा वर्षांत रिंग रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रिंग रोडची हद्द वाढविण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने रिंग रोडची हद्द निश्चित होणार आहे.