पुणो : एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणाचा अहवाल महाविद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाला सादर करण्यात आला आहे. मात्र, या अहवालानुसार महाविद्यालयाकडून या प्रकरणाबाबत फारशी ठोस भूमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे. परंतु, पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा, असे पत्र महाविद्यालयातर्फे कोथरूड पोलिसांना देण्यात आले आहे.
कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ‘‘विद्यापीठातर्फे एमआयटीमधील रॅगिंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाने या संदर्भातील अहवाल विद्यापीठाला 24 तासांत सादर करावा, असे पत्र विद्यापीठातर्फे महाविद्यालयाला पाठविण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी महाविद्यालयाकडून या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला. महाविद्यालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. मात्र, या समितीला सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण रॅगिंगचे आहे का? याबाबत स्पष्टता आली नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी पोलिसांनी करावी, असे समितीतर्फे सूचित करण्यात आले. महाविद्यालयाने केलेल्या कार्यवाहीमध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबतची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल.’’
विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजयकुमार दळवी म्हणाले, ‘‘मी पीडित विद्याथ्र्याच्या पालकाशी संवाद साधला आहे. विद्याथ्र्याचे पालक एमआयटी महाविद्यालयाने केलेल्या कार्यवाहीबाबत असमाधानी आहेत. तसेच विद्याथ्र्याची मानसिक स्थिती अस्थिर असून, त्याला फिट्स येत आहेत. तसेच तो झोपेत बडबड करतो. त्यामुळे या विद्याथ्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. झोपेत बडबड करत असल्यामुळेच आपल्या मुलावर रॅगिंग होत असल्याची माहिती पालकांना समजली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.’’
रॅगिंग प्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीचे पालन केले गेले नाही तर संबंधित महाविद्यालयाची संलग्नता काढून घेण्यार्पयतची कारवाई केली जाते. त्यामुळे एमआयटीकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली होती का? याची सखोल चौकशी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
च्विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समित्यांची स्थापना केली जाते. परंतु, या समित्यांच्या नियमितपणो बैठका घेतल्या जात नाहीत तसेच त्याचा आढावा घेऊन योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत, असे बोलले जाते. मात्र, यासंदर्भात प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी केली जाते. त्यामुळे महाविद्यालयांमधील रॅगिंग समित्या कागदावरच राहतात, असे म्हणणो योग्य ठरणार नाही.
च्ज्या महाविद्यालयात सक्षम यंत्रणा आहे, त्या महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला कोणाकडून त्रस दिला जात असल्यास त्याची तात्काळ दखल घेतली जाते. तसेच रॅगिंगविरोधी समिती आणि शिस्त समितीकडून हे प्रकरण हाताळले जाते. महाविद्यालयांनी रॅगिंग संदर्भातील माहिती आपल्या माहिती पत्रकात प्रसिद्ध करणो, सूचना फलकावरही लावणो गरजेचे आहे. त्याचप्रमाणो रॅगिंगविरोधी समितीचा दोन ते तीन महिन्यांनी आढावा घेणो आवश्यक आहे.
पीडित विद्याथ्र्याच्या पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यानंतर महाविद्यालयास 1 ऑक्टोबर रोजी समितीचा अहवाल प्राप्त झाला. समितीने दिलेल्या अहवालानुसार महाविद्यालयाने 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
- डॉ.एल.के. क्षीरसागर,
प्राचार्य, एमआयटी