शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

31st December: हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना थेट जेलची हवा; 'थर्टी फर्स्ट' च्या बंदाेबस्तासाठी पुण्यात ३ हजार पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 11:27 IST

पोलिसांकडून लष्कर परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी

पुणे : तरुणाईकडून ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी पाहता शहर पोलिस दलातील सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त रस्त्यावर असणार आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जाईल. त्याचबरोबर ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या कारवाया हाेतील. यात ब्रिथ ॲनलायझरचा वापर करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून लष्कर परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी केली आहे. याबरोबरच पोलिस अभिलेखावरून गुन्हेगारांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा घातपात होणार नाही, महिलांची सुरक्षितता, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत बंदोबस्तावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, गुन्हे शाखेच्या पथकांना ३१ डिसेंबर रोजी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून अशी होणार तपासणी

- पोलिस ठाणे, वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी- मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा ‘वॉच’- सोनसाखळीचोर, पाकीटमार यांच्यावर गुन्हे शाखेकडून ठेवला जाणार वचक- महिलांबाबत गैरकृत्य केल्याचे आढळल्यास होणार कडक कारवाई- हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

 

टॅग्स :PuneपुणेNew Yearनववर्षSocialसामाजिकPoliceपोलिस