ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.१३ - लोहगाव येथे किशोरवयीन मुलांमधील वादाचे पर्यवसान होऊन बुधवारी रात्री 12 वाजता दोन समाजातील तुंबळ हाणामारी, दगडफेक व दंगलीत रुपांतरीत झाला. मराठा व गारुडी समाजात रात्री सव्वानऊच्या सुमारास झालेल्या भांडणानंतर लोहगाव पोलिस चौकिसमोर मध्यरात्री दोन्ही बाजूकडील ४००-५०० लोकांचा जमाव जमला होता. विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्रभर लोहगावमध्ये तळ ठोकून आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून फिर्यादी देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटकसत्र व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे. गुन्हे शाखा व विमानतळ पोलिसांकडून अटकसत्र अजून सुरु असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मराठा समाजाकडून आज लोहगाव बंदची हाक देण्यात आली असून येथील मंदिरात सकाळी अकराला ग्रामस्थांची बैठक होणार आहे