पुणे : श्रावण महिना सुरु झाल्यापासून पुणे शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी काेसळत अाहे. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरणक्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत अाहे. त्यामुळे मुठा दुथडी भरुन वाहत असून मंगळवारी भिडे पूल दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे या पुलावरची वाहतूक थांबविण्यात अाली. खडकवासला धरणातून साेमवारी रात्री 18,491 क्सुसेकने विसर्ग करण्यात अाला. हा विसर्ग मंगळवारी संध्याकाळपर्यंत कायम हाेता. तर बंडगार्डन येथे बांधण्यात अालेला बंधार वर उचलल्याने तेथून 38,608 क्सुसेसने पाणी पुढे जात हाेते.
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं भरली अाहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत अाहे. साेमवारी रात्रीपासून 18491 क्युसेकने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत अाहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला अाहे. पाेलीस प्रशासन अाणि महापालिकेकडून वेळाेवेळी पावसाळ्यात नदीपात्रात वाहने न लावण्याच्या सूचना केल्या जातात, परंतु काही नागरिक हे याकडे दुर्लक्ष करुन अापली वाहने नदीपात्रातच लावत असल्याने त्यांची वाहने पाण्याखाली गेल्याचे चित्र हाेते. त्याचबराेबर पाण्याबराेबर वाहून अालेला कचरा भिडे पुलाला अडकून पडला हाेता. यात थर्माकाेलचे प्रमाण अधिक हाेते. या पाण्यात एका म्हशीच्या वासराचा जीव गेला. भिडे पुलाजवळील स्थानिकांनी या वासराला पाण्याबाहेर काढले परंतु त्या वासराचा मृत्यू झाला हाेता.
भिडे पुलावरील वाहतूक थांबवून वाहतूक इतर रस्त्यांनी वळवल्याने शहरात वाहतूक काेंडी झाली हाेती. शहरातील गल्लीबाेळांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. संध्याकाळी या वाहतूक काेंडीत अाणखीनच भर पडली. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता त्याचबराेबर विधी महाविद्यालय रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी वाहतूक संथगतीने सुरु हाेती. गणेशाेत्सव जवळ अाल्याने अनेक ढाेल पथके नदीपात्रात सराव करत असतात. परंतु धरणातून पाणी साेडल्यामुळे त्यांना सराव करता अाला नाही. नदीचे पाणी पाहण्यासाठी गाडगीळ पुलावर तरुणांची गर्दी झाली हाेती.
खडकवासला धरण साखळीमधून करण्यात अालेला विसर्गखडकवासला - 18, 491पानशेत - 5808वरसगाव - 6077टेमघर - 782