पुणे : शुभम कदमच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर रायझिंग स्टार अकादमीने सनी इलेव्हन चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनराईज क्रिकेट स्कूलवर ९४ धावांनी विजय मिळवला.
रायझिंग स्टार अकादमीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सहा बाद १९५ धावा केल्या. सनराईजला २० षटकांत नऊ बाद १०१ धावांवर रोखून रायझिंग स्टार अकादमीने विजय मिळवला. रायझिंग स्टार अकादमीकडून शुभम कदमने ३७ चेंडूंत चार चौकार आणि नऊ षटकारांसह ८४ धावा केल्या. इतर फलंदाजांच्या साथीत त्याने संघाला १९४ पर्यंत नेले. सनराईजकडून हेतांश भारड, गोविंद राठी, वरद हांडे, जुनैद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सनराईजकडून सुजल मोरे (३०), जुनैद खान (२०) यांनी झुंज दिली. रायझिंग स्टारकडून कुणाल खाडे, रविंद्र भुजबळ आणि विशाल शिंदे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शुभम कदमला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फोटो - शुभम कदम