पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत नियंत्रणात येत असताना पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मात्र कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहे. रविवार जिल्ह्यात एका दिवसांत २५८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 46 तर ग्रामीण भागात एकाच दिवसांत १८ रुग्ण वाढले आहेत.यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ५६४९ झाले आहेत. तर रविवार 8 मृत्यू झाला असून आता पर्यंत एकूण २७२मृत्यू झाले आहेत.पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात मात्र नियंत्रणात होती. परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई सारख्या रेड झोन मधून नागरिक पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संक्रमण होऊ लागले आहे. तर पिंपरी चिंचवड मध्ये देखील याचा परिणाम होऊ लागला आहे. ग्रामीण भागात सुरूवातीला केवळ एक ते दोन नवीन रूग्ण सापडत होते. नंतर हे प्रमाण ३ ते ५ पर्यंत वाढले. परंतु रविवार (दि. २४) रोजी एका दिवसांत सर्वाधिक १८ रुग्ण वाढले. --- एकूण बाधित रूग्ण : ५६८४पुणे शहर : ४८५९पिंपरी चिंचवड : ३४५कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ४९०मृत्यु : २७२
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतोय; रविवारी दिवसभरात २५८ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:25 AM
जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ५६४९ ८ मृत्यू
ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढ