दावडी : गुळाणी येथील तलावात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, फेब्रुवारी महिन्यात या तलावात पाणी संपुष्टात येणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गुळाणी हा तलाव दोन महिन्यांपूर्वी तुंडुब भरून वाहत होता. या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत असल्याने गेल्या महिनाभरात या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी या तलावातील पाण्यावर रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी तसेच तरकारी पिके घेतली आहे. त्यामुळे या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत आहे. हा उपसा असाच सुरू राहिला तर महिनाभरात या तलावात पाणीसाठा संपुष्टात येणार आहे. या तलावालगत गुळाणी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. तसेच या परिसरातील डोंगर परिसरात राष्ट्रीय पक्षी मोर आहेत. तलावातील पाणी पिण्यासाठी मोर येतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)
गुळाणी तलाव आला अर्ध्यावर
By admin | Published: January 09, 2017 1:58 AM