शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

नदी सुधार योजना: नदीपात्रात ७० किमीची वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:09 AM

मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

पुणे - मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्थायी समितीसमोर सल्लागार कंपनीच्या वतीने मंगळवारी सादरीकरण करण्यात आले. जपानधील जायका कंपनीने या कामासाठी ९०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून केंद्र सरकारने त्याची हमी घेतली आहे व त्यात ८५ टक्के अनुदानही केंद्र सरकारच देणार आहे.प्रकल्पाचा एकूण खर्च ९९० कोटी २६ लाख रुपये इतका आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे ८४१.७२ कोटी रुपये केंद्र सरकार अनुदान म्हणून देणार आहे. महापालिकेचा यातील हिस्सा १४८ कोटी ५४ लाख रुपये आहे. २०१८ मध्ये काम सुरू होईल व ते सन २०२३ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. मुळा-मुठा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी करून पाण्याची, तसेच नदीच्या परिसंस्थेची गुणवत्ता सुधारणे हा महत्त्वाचा उद्देश या योजनेमागे आहे. त्याशिवाय त्याअनुषंगाने इतरही अनेक कामे यात करण्यात येतील. पुणे शहर आणि परिसराचे स्वच्छता आणि आरोग्य संवर्धनासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयनिर्मिती करणे, संस्थात्मक आणि नागरी प्रबोधन, संस्थात्मक सक्षमीकरण, प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशस्वितेकरिता जनजागृती करणे व मुख्य म्हणजे नदीमध्ये येणारे सांडपाणी थांबवणे या कामांचा त्यात समावेश आहे.मुख्य मलवाहिनी व त्याला जोडून उपवाहिन्याही यात तयार करण्यात येणार आहे. तसेच मैलापाणी शुद्धीकरण करणाऱ्या ११ नव्या केंद्रांची बांधणीही यात करण्यात येणार आहे. ३९६ दशलक्ष लिटर इतक्या मैलापाण्यावर रोज शुद्धीकरण प्रक्रिया केली जाणार आहे. जपानमधील तंत्रज्ञान वापरून हे काम करण्यात येईल. या सर्व केंद्रांच्या सलग १० वर्षे देखभालदुरुस्तीची जबाबदारीही काम करणाºया ठेकेदार कंपनीवरच सोपविण्यात आली आहे.योजनेचे काम सुरू करण्यात आले असून बाणेर येथे मैलापाणी वाहिन्या बांधणे सुरू झाले आहे. एकूण ४३ किलोमीटरच्या वाहिन्या बांधण्यात येत आहेत. नदीच्या डाव्या (३३ किमी) व उजव्या (३७.६ किमी) किनाºयांकडील मैलापाणी वाहिन्यांच्या निर्मितीचे सर्वेक्षण व डिझाईनचे काम सुरू आहे, ठेकेदारांच्या पात्रता निकषाबद्दलची कागदपत्रे जायकाला पाठविण्यात आली आहेत. केंद्र सरकारकडून खर्चासाठी म्हणून आतापर्यंत ५७ कोटी ७४ लाख रुपये पालिकेला प्राप्त झाले असून त्यातील २७ कोटी ५३ लाख रुपये खर्च झाले आहेत.११ नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे- प्रकल्पाअंतर्गत ११ नवीन मैलापाणी शुद्धीकरणकेंद्रांची निर्मिती- ३९६ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढ्या मैलापाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया- नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील पाण्याची गुणवत्ता पुढीलप्रमाणे असेल - १० एमजी/एल बीओडी, १० एमजी/एल टीएसएस, तसेच नायट्रोजन व फॉस्फरस काढणे- अस्तित्वात असणाºया चार पंपिंग स्टेशनमध्ये सुधारणा करणे- प्रकल्पातील नव्या व जुन्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमध्ये केंद्रीयस्काडा सिस्टिम बसवूनपाण्याचा प्रवाह, गुणवत्ताआणि क्रियाशीलतातपासणे

टॅग्स :Puneपुणेriverनदी