भोर-महाड रस्त्यावर भोरपासून वरवंडपर्यंत नवीन रस्ता तयार केला. मात्र, सदर रस्त्यावर महाड हद्दीपर्यंत झाडे झुडपे वाढली असून, गटारे काढलेली नाहीत.त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.यामुळे रस्त्याला खड्डे पडून नवीन झालेला रस्ता खराब होणार असून आपटी गावाजवळ रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.वरवंड गावाच्या हद्दीपर्यंत स्त्यावर कारपेट झाले आहे.तर वरवंड ते शिरगाव
दरम्यानच्या ५ ते ६ किलोमीटर रस्त्यावर कारपेटचे काम झालेले नाही.त्यामुळे बीबीएमचे काम उखडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहे.तर घाटातील चार किलोमीटरचा रस्ता वगळता संपूर्ण रस्ताच खराब झाला असून खड्डे पडल्याने नागरिक पर्यटक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिरगाव ते भोर हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील कामाला सुमारे
साडेसात कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र ठेकेराच्या हलगर्जीपणामुळे सदरचे काम अद्याप सुरूच नाही.तर आपटी ते वरवंडपर्यंत कारपेट पूर्ण असून वरवंडच्या पुढे शिरगाव व शिरगाव ते महाड हद्दीपर्यंत रस्ता मागील दोन वर्षां पासून अपूर्ण आहे. यामुळे गाड्या चालवणे अवघड असून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, भोर-महाड रस्त्यावरील निगुडघर गावाजवळ म्हसर गावाच्या ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावर, पावसाचे गुडघाभर पाणी साचले आहे, यामुळे सदरच्या पुलाला धोका होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रोडवरील गटारे झाडेझुडपे काढणे महत्त्वाचे आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी अद्याप कामे झालेली नाहीत.
भोर-महाड रस्त्यावरील गटारे व झाडेझुडपे तोडण्याचे काम सुरू आहे. घाटात अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. त्यामुळे सावधानता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संंजय वागज यांनी सांगितले.
भोर-महाड रस्त्यावरील निगुडघर येथे पुलावर पाणी साचले फोटो