फुरसुंगी : सत्यपूरम ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर फक्त सिग्नल बसवून दुभाजक टाकून वाहतूक सुरळीत होणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम हा रस्ता दुतर्फा होणे फार गरजेचे आहे. पालखी महामार्ग म्हणून मंजूर असलेला हा रस्ता गेली कित्येक वर्षं तेवढाच आहे. रस्ता रुंदीकरणासाठी कित्येकवेळा मोजमाप झाले आहे; परंतु प्रत्यक्षात अजून किती
वर्षांनी हा रस्ता मोठा होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली अतिक्रमणे कित्येकदा हटवूनसुद्धा अजूनही या रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला नाही. तुकाईदर्शनच्या मुख्य रस्त्याने जड वाहतुकीस फक्त बंदी असलेला फलक लागलेला आहे. प्रत्यक्षात रोज या ठिकाणी जड वाहतूक राजरोसपणे सुरूच आहे. फक्त एका मोठ्या कंपनीसाठी एवढा मोठा दुभाजक त्यांच्या गेटसमोर ठेवून सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्या रोडवर रोजच सर्रास पणे गाड्या पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई आजतागायत झालीनाही.या रोडवर असलेल्या एका मोठ्या शाळेच्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या टायमिंगमध्ये शाळेच्या गाड्या, पालकांच्या गाड्या यांनाही शाळेची कसलीही पार्किंगची व्यवस्था नाही. जोपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार नाही. या परिसरातील नागरिकांनी सुद्धा स्वयंशिस्त पाळण्याची खूप गरज आहे.पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाहतूक सुरुळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, रस्ता मोठा झाल्याशिवाय आणि योग्य पद्धतीने दुभाजक झाल्याशिवायवाहतूककोंडी टाळणे अशक्य आहे.१ मगरपट्ट्यासारख्या परिसरात चौकात सिग्नल ओलांडल्यानंतर, डायरेक्ट मगरपट्ट्याच्या मेन गेटसमोरच डिव्हायडर टाकला आहे. लोकांना सुरुवातीला त्रास झाला; पण आता सर्व लोकांना त्याची सवय झाली आहे.२ सासवड रस्त्यावर हे होणे अपेक्षित आहे. फक्तएका कंपनीसाठी त्या रस्त्यावर डिव्हायडर टाकणे योग्य आहे का?३ काळेपडळवरून तुकाईच्या रस्त्याने सासवड रोडला वळण्यासाठी लोकांनी एक तर पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.४कंपनीसमोर जी चौपाटी, चहाचे स्टॉल उभे आहेत तिथे थांबणारे नागरिक, ओला, उबर; तसेच कंपनीच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यांच्यावर कारवाई करून याठिकाणी नो पार्किंग झोन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.५रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून रस्ता मोकळा केला पाहिजे. अनेक दिवसांपासून असणारा हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.यापूर्वी स्टॉलच्या समोर असणाºया दुचाकीला जॅमर लावून कारवाई केली आहे. स्टॉलवर खटले देखील भरले आहेत. लेक्सिकोन स्कूलची मीटिंग घेऊन त्यांना पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. तसे त्यांना पत्र देखील दिले आहे. १६ स्कूल बसवर कारवाई केली आहे. रस्तारुंदीकरणासाठी बांधकाम विभागाला पत्रदेखील दिले आहे.-शब्बीर सय्यद,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक विभाग