पुणे : देहूरोड-कात्रज महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेले दुभाजक, कमी उंची, रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आणि स्पीडब्रेकर यांमुळे अपघात वाढले आहेत. मुंबई-बंगलोर महामार्गावर वारजे हायवे, माई मंगेशकर हॉस्पिटल, आरएमडी इन्स्टिट्यूट, चांदणी चौक, डुक्करखिंड-बावधन या महामार्गावर दुभाजकांची उंची फार कमी आहे. तसेच अनेक ठिकाणी दुभाजक तुटले आहेत. मध्येच खचलेले रस्ते, रस्त्यावर उभे केलेले लोखंडी पिंप, दगड रस्त्याच्या कडेच्या बाजूला ठेवून कठडे तयार करण्यात आले आहेत. याच भागात वारंवार अपघात घटना घडत आहेत. या भागातून पुण्याचा आयटी हब असणारा हिंजवडी भाग तसेच औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड यांना जाणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या दुचाकी, तीनचाकी, मिनीबस, पीएमपी यांची वर्दळ या हायवेवर वाढली आहे. शेजारी विविध सोसायटींची बांधकामे हायवेला लागून सुरू झाल्याने रस्ता वारंवार खराब होतो. जड वाहतूक याला कारणीभूत असल्याचे वाहतूकदारांचे मत आहे. नियमितपणे कामावर जाणारे कंपनीचे कामगार पिंपरी-चिंचवड, निगडी, आकुर्डी, हिंजवडी, बाणेर या भागातील असल्याने रस्त्याच्या ........ व खिंडीचे होणारे अपुरे काम यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. यात रस्त्यावरील सकाळी व सायंकाळी होणाऱ्या गर्दीमुळे वारजे चौक, चांदणी चौक, हिंजवडी चौक, भूमकर चौकांमध्ये वारंवार ट्रॅफिक जामही झालेला दिसतो.आता या अपघातांच्या निमित्ताने हायवे प्राधिकरण, महानगरपालिका, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून मुंबई-बंगलोर महामार्गातील दुभाजकाची उंची वाढवावी तसेच रस्त्यावर कठडे बांवी.... घेऊन कामाच्या ठिकाणी माहितीफलक लावून हायवेवरील मध्येच व कडेला पडलेला राडारोडा काढला तरच या अपघातावर निश्चित नियंत्रण आणता येईल.अक्षम्य दुर्लक्ष व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे आतापर्यंत यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)
रस्ता की मृत्यूचा सापळा?
By admin | Published: November 16, 2015 2:01 AM