आळंदी शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कामे करण्यात आली आहेत. मात्र, आळंदी शहरातील अंतर्गत काही रस्ते खराब झाले आहेत. आळंदीतील वडगाव चौकातून पद्मावती मंदिराकडे जाणारा रस्ता खड्डेमय अवस्थेत असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी-चारचाकी चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सदरच्या रस्त्याचा अनेक नागरिकांना दळणवळण करण्यासाठी उपयोग होत आहे. मात्र, रस्ता नादुरुस्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेऊन चांगला रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी आळंदीकरांकडून केली जात आहे.
२४ आळंदी पद्मावती रस्ता
आळंदीतील पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे.