बारामती : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शिवक्रांती प्रतिष्ठान आणि शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान आणि व्यसनमुक्ती शिबिर उपक्रम राबविण्यात आला.बारामती शहरातील धों. आ. सातव हायस्कूलमध्ये शिबिर घेण्यात आले. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सांगोलकर यांनी सुरक्षित वाहतूक या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान, व्यसनांचे दुष्परिणाम या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना सांगोलकर यांच्यासह नगरसेवक सचिन सातव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे चंद्रकांत लोंढे, सुलतान तांबोळी, विनोद पवार, लखन कांबळे, शेखर कोरपडे यांनी परिश्रम घेतले. या वेळी नगरसेवक सूरज सातव, संतोष जगताप, दिलीप ढवाण पाटील, आदित्य हिंगणे, सहायक फौजदार केशव बोरुडे, इंदापूर तालुका व्यसनमुक्ती युवक संघ अध्यक्ष तानाजी पांडवे, व्याख्याते वैभव कोंडे देशमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.(वार्ताहर)
विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान
By admin | Published: January 23, 2017 2:20 AM