-----------------
दीपक होमकर : पुणे
रस्त्यावर खड्डे खोदावे लागणार नाहीत असे मांडव आणि फ्लेक्स उभे करण्याच्या महापालिकेच्याच सूचना असताना महापालिकेच्याच पदाधिकाऱ्यांनी खड्डे खोदून त्यात बांबू रोवून भले मोठे फ्लेक्स उभे केले. रस्त्यावर हे खड्डे खोदून फ्लेक्स उभारले गेले तेही केंद्रित रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते वडगाव पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा भल्या फ्लेक्सचा अक्षरश: बाजार भरला आहे. गल्लीतल्या कार्यकर्त्यांपासून ते नगरसेवक, आमदरांपर्यंत अनेकांची छबी असलेल्या ५०-५० फुटांच्या फ्लेक्सने सिंहगड रस्ता विद्रृपी झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर दुतर्फा फ्लेक्सची उभे राहत आहेत. रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून रस्त्याच्या लांबीबरोबर स्पर्धा करणारे फ्लेक्स उभे काही ठिकाणी खड्डे न खोदता बांबूच्या आधारावर उभे केले आहेत, तर काही ठिकाणी चार-चार फुटांवर खड्डे खोदून त्यात बांबू रोवून फ्लेक्स उभे केले गेले आहेत. रस्त्याच्या दुभाजकावरह जाहिरातीसाठी आणि पथदिव्यांसाठी उभ्या केलेल्या खांबावंरही ठिकठिकाणी छोटे-छोटे फ्लेक्स अडकविले तर चौकामध्ये दुभाजकातील झाडांची नासधूस करीत मोठे फ्लेक्स उभा करून रस्ते मंत्र्याच्या स्वागताचा अट्टाहास कार्यकर्त्यांनी केला आहे.
रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून उभे केलेल्या डिजिटल फ्लेक्ससाठी सिग्नलच्या दिव्यांचे खांब, पथदिवे, टेलिफोन लाईनचे दिवे, उच्चदाब गॅसवाहिनीची खबरदारी सांगणारे खांब, आदी सगळ्यांचाच आधार घेत त्याच्या खांबाला फ्लेक्स बांधले गेले आहेत. शिवाय वाऱ्याने फ्लेक्स पडू नये यासाठी फुटपाथवरच उभ्या-तिरप्या काठ्याला लाऊन भल्या मोठ्या फ्लेक्सला आधार देण्यात आला आहे. त्यामुळे फूटपाथ व बंद झाले असून, पादचाऱ्यांना या वर्दळीच्या रस्त्यावर फूटपाथ सोडून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
---
भूमिपूजनाच्या श्रेयनामावलीचा शिल्पही फूटपाथवरच बांधला
---
उद्घाटन कार्यक्रमासाठी विठ्ठलवाडीच्या समोरील डोंगराच्या पायथ्याजवळी मैदानात भला मोठा मांडव व मंच तायर करण्यात आला होता. तेथेच वाहनांच्या पार्किंगची जागाही करण्यात आली होती. वास्तविक, भूमिपूजनाच्या श्रेयनामावलीचे शिल्पाचे अनावरही मंचावरच शिल्प ठेवून करणे शक्य होते. तरीदेखील संयोजकांनी श्रेयनामावलीचे शिल्प सिंहगड रस्त्यावरील फूटपाथवर पक्क्या काँक्रीटने बांधले व तेथेच पडदा सरकावून या शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
--
फोटो क्रमांक : २४पुणे नितीन गडकरी रस्ता चाळण १
फोटो ओळी : नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी रस्त्याचे विद्रूुपीककरण होईल इतके भले मोठे लावलेले फ्लेक्स
--
फोटो क्रमांक : २४पुणे नितीन गडकरी रस्ता चाळण -२
फोटो ओळी : रस्ता खोदून त्यामध्ये रोवलेले फ्लेक्सचे बांबू
--
फोटो क्रमांक २४ पुणे नितीन गडकरी रस्ता चाळण -३
फोटो ओळी : फूटपाथवर रोवलेल्या फ्लेक्समुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे भाग पडले.