भुलेश्वर : राजेवाडी ते सणस मळामार्गे पिसर्वेकडे जाणाऱ्या राजेवाडी रेल्वे स्टेशनजवळील पूल क्रमांक ४५/१ या पुलाखालील रस्त्याचे व पुलाखालील सणस तलावात जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु झाले आहे.
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल रेल्वेचे सदस्य प्रविण शिंदे ,राजेवाडी ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने सणस मळ्यातील नागरिकांना घेऊन पुणे रेल्वे विभागीय रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांची पुण्यात भेट घेतली होती. राजेवाडी ते सणस मळा रस्त्या दरम्यान रेल्वेच्या पुलाखाली भराव टाकल्याने शंभर वर्षांपूर्वीचा रस्ता बंद झाला होता हा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत होते. राजेवाडी येथे बँक,पोस्ट, महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय , किराणा दुकान ,आठवडे बाजार , सरकारी जनावरांचा दवाखाना, रात्री अपरात्री वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही, शेतकऱ्यांना दररोजच्या शेतीच्या कामासाठी सात किलोमीटर अंतरावरून जावे लागत होते. पुलाखालील एका मोरीतून पाईपलाईन टाकून अडलेले पाणी काढून द्यावे लागणार होते, तर दुसऱ्या मोरीतून पुलाजवळ पाईप टाकून रस्ता करावा लागणार असून हे काम तातडीने न केल्यास परिसरातील शेतीही पाण्याखाली जाण्याची भीती आहे. पावसाळ्यात पाणी गावात शिरण्याचा धोका असल्याचे या वेळी लेखी निवेदनात सांगितले होते यासारख्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा रेल्वेच्या प्रबंधक रेणू शर्मा यांचेशी आदर्श शिक्षक गुलाबराव सणस,संजय सणस,सागर सणस, राजेंद्र दरेकर व संभाजी कोकाटे यांनी मांडल्या. रेणू शर्मा यांनी सर्व अडचणी समजावून घेतल्या होत्या. सरपंच रामदास जगताप ,उपसरपंच आशा जगताप ,सदस्य राजेंद्र शिंदे यांच्यासह स्थानिकांनी सांगितलेल्या अडचणींबाबत चर्चा करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.
फोटो ओळ - राजेवाडी रेल्वेखालील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.