राजेवाडी ते सणस मळा रस्ता सुरु करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सेंट्रल रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे ,राजेवाडी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने पुणे रेल्वे विभागीय रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीमध्ये
राजेवाडी ते सणस मळारस्त्या दरम्यान रेल्वेच्या पुलाखाली भराव टाकल्याने शंभर वर्षांपूर्वीचा रस्ता बंद झाला.हा रस्ता बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे पुलाखालील एका मोरीतून पाईपलाईन टाकून अडलेले पाणी काढुन द्यावे लागणार आहे. तर दुस-या मोरीतून पुलाजवळ पाईप टाकून रस्ता करावा लागणार असून हे काम तातडीने न केल्यास परिसरातील शेतीही पाण्याखाली जाणार असून पावसाळ्यात पाणी गावात शिरण्याचा धोका असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या सारख्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा रेल्वेच्या प्रबंधक रेणू शर्मा यांचेशी आदर्श शिक्षक गुलाबराव सणस,संजय सणस,सागर (गोटू) सणस, राजेंद्र दरेकर व संभाजी कोकाटे यांनी केली.विभागीय प्रबंधकांचे स्वीय सहाय्यक मिलिंद वाघोलीकर यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना सूचना करून पंधरा दिवसांत प्रत्यक्षात पहाणी करून काम सुरू करावे ,असे सांगितले. काम तातडीने सुरु करण्याचे आश्वासनही सर्वांना देण्यात आले
यावेळी ग्रामपंचायत राजेवाडी यांनी तयार केलेले निवेदन प्रबंधक रेणू शर्मा यांना देण्यात आले.
राजेवाडी ते सणसमळा रस्त्याच्या कामाचे निवेदन देताना राजेवाडी ग्रामस्थ.