भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीत मागील पावसाळ्यात पडलेले संरक्षक भिंतीचे काम मागील ३५ दिवसांपासून अत्यंत संथगतीने सुरु आहे. अशाच पध्दतीने काम सुरु राहिल्यास ८० दिवसांत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत. यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करीत असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत जोर धरत आहे.
भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षण भिंत १३ ऑगस्ट २०२० रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. यामुळेेे मागील सात महिन्यांपासून मोठ्या गाड्यांची वाहतूक बंद होती. लहानच गाड्या सुरू होत्या. हा रस्ता व संरक्षक भिंती दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ५ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाडकडून मंजूर झाला आहे. अंदाजपञक तांञिक मान्यता होऊन निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.सदरच्या कामासाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यत ८० दिवस सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे.
वरंधा घाटातील सदर रस्त्याचे काम करण्याची जागा दुर्गम आहे. या ठिकाणी एक खाली तीन मोठी तीव्र उताराचे वळण असून जागा अत्यंत अरुंद आहे. संरक्षक भिंतीचे काम करताना खोलवर खोदाई करावी लागणार आहे तसेच कामासाठी लागणारी यंत्रसामग्री इतर सहित्यासाठी जागा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे काम सुरु असताना अपघात होऊ नये म्हणून सदार रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील ३५ दिवसांपासून रस्त्यावरील वाहतूक बंद असून संबंधित ठेकेदाराने सध्या संरक्षक भिंतीच्या पायाची खोदाई केली असून मातीचे उत्खनन केलेले आहे. मात्र भिंतीच्या काँक्रेटचे काम अद्याप सुरु झालेले नाही.त्यामुळे पुढील ४५ दिवसांत काम पूर्ण होईल का? मे महिना पण काम करण्यासाठी जाणार, अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
वरंध घाट बंद असल्याने हाॅटेलसह अनेक उद्योगांवर परिणाम
भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीतील वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी घाट बंद असल्यामुळे भोर शहरासह सदर रस्त्यावरील हाॅटेल व्यवसाय बंद असून भाजीपाला वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहतूक गाड्या मालवाहतूक गाड्या बंद असून पर्यटकांना कोकणात जाण्यास जवळचा मार्ग बंद असल्याने मुळशीतील ताम्हणी
किंवा महाबळेश्वरवरुन आबेनळी घाटाचा वापर करुन कोकणात जावे लागते हे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत.
भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड हद्दीतील सुरु असलेले काम फोटो