शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:45 PM

पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असून चांगल्या दर्जाचे होण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवणार

नारायणगाव : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली तालुक्यातील कामांचे कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्ष सूरुवात होणार आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत कामांच्या मंजुरीसाठी मुळातच बराच काळ लागला होता. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकर कामे सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु ग्रामविकास विभागाकडून या निविदांना मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेरीस ही मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली असल्याने आता लवकर ही कामे सुरू होतील. सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

जुन्नर तालुका  पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ओतूर पानसरेवाडी डुंबरवाडी रस्ता ६.२ कि.मी. रक्कम रु. ३.९१ कोटी, बोरी बुद्रुक ते राजुरी उंच खडकवाडी रस्ता ७ कि.मी. रक्कम रु.४.८२ कोटी, आळे भटकळवाडी वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव रस्ता. ८.०४ कि.मी. रक्कम रु.५.६६ कोटी, आणि खोडद ते SH-112 रस्ता ४.०५ कि.मी. रक्कम रु. ३.१५ कोटी अशा एकूण ४ रस्त्यांसाठी २६.२७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

आंबेगाव तालुका 

आंबेगाव तालुक्यातील पारगाव काटापुर बुद्रुक लाखणगाव रस्ता ७.०८ कि.मी. रक्कम रु.८.३७ कोटी, प्रजिमा १४ वैदवाडी ते इजिमा ३० रस्ता ५.०४ कि.मी. रक्कम रु. ५.८० कोटी आणि प्रजिमा ५ कानसे गंगापूर बुद्रुक खुर्द ठाकरवाडी पारुंडे रस्ता. ८.०१ कि.मी. रक्कम रु. ६.४५ कोटी अशा तीन रस्त्यांसाठी रु. २०.६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

खेड तालुका 

खेड तालुक्यातील काळुस ते संगमवाडी. ४.५५ कि.मी. रु. ३.२९ कोटी, प्रजिमा १९ खरपुडी बुद्रुक ते रेटवडी वाकळवाडी वरूडे. ४.०४ कि.मी. रक्कम रु. ३.५४ कोटी आणि  प्रजिमा १६  हेद्रुज बच्चेवाडी कडलगवाडी वाशेरे कोहींडे बुद्रुक रस्ता. ९.१५ कि.मी. रक्कम रु. ७.९३ कोटी अशा ३ रस्त्यांसाठी १४.७६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शिरूर-हवेली तालुका 

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण ६ रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यानुसार शिरूर तालुक्यातील प्रजिमा ९ अहमदाबाद ते दुडेवाडी ते निमगाव दुडे ते प्रजिमा ५१. ६.४ कि.मी. रक्कम रु. ४.७८ कोटी, प्रजिमा ५३ कोळगाव डोळस ते प्रजिमा १०० मांडवगण फराटा ते पिंपळसुटी. ९.५७ कि.मी. रक्कम रु.१२.४९ कोटी आणि रा‌ज्यमार्ग ११८ न्हावरा ते निर्वी धुमाळवस्ती ते कोळपेवस्ती. ५.१० कि.मी. रक्कम रु. ६.२२ कोटी आणि हवेली तालुक्यातील प्रजिमा २९ डोंगरगाव ते वाडेबोल्हाई गोतेमळा भिवरी ते कोरेगाव मूळ रस्ता. ४.०६ कि.मी. रक्कम २.२६ कोटी, रा.मा. ९ सोरतापवाडी तरडे खालचे ते तरडे वरचे तरडे रस्ता. ५.०४ कि.मी. रक्कम ४.६३ कोटी आणि राज्यमार्ग ११६ केसनंद ते वाडेगाव गोतेमळा आष्टापूर हिंगणगाव रस्ता, ७.१३ कि.मी. रक्कम ६.११ कोटी या एकूण ३६.४९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेvidhan sabhaविधानसभाroad safetyरस्ते सुरक्षाJunnarजुन्नरShirurशिरुरambegaonआंबेगाव